Hirakot Lake
Hirakot Lakesakal

Hirakot Lake: मराठा साम्राज्याचा साक्षीदार असलेल्‍या तलावाला आहे ३०० वर्षांचा ऐतिहास

Hirakot Lake: किल्ल्यात आंग्रेंचा खजिना असे, आज त्याचा वापर कारागृह म्हणून केला जातो.
Published on

Alibagh News: मराठा साम्राज्याचा मूक साक्षीदार असलेल्‍या हिराकोट तलावाला ३०० वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी आणि मराठ्यांमधील तत्कालीन रक्तरंजित संघर्ष, आंग्रे कुटुंबीयांमधील कलह, इंग्रज अधिकाऱ्यांची बडदास्त ते देश स्वतंत्र झाल्यानंतर खादीमध्ये वावरणाऱ्या राजकीय नेत्यांची उठबस, आंदोलने, मोर्चे यांसारख्या अनेक घटनांचा हा तलाव साक्षीदार आहे.


पूर्वीचा कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील अनेक घटना तलाव परिसरात घडल्या आहेत. याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस मुख्यालय, जिल्हा न्यायालयासह अन्य महत्त्वाची कार्यालये आहेत. आज हा तलाव पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे.

मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १६९८ मध्ये अलिबाग शहराची नव्याने उभारणी सुरू केली. त्या वेळी रामनाथ भागात हिराकोट नावाचा छोटासा भुईकोट किल्ला कान्होजी आंग्रे यांनी १७२० मध्ये बांधला. किल्ल्यात आंग्रेंचा खजिना असे. आज त्याचा वापर कारागृह म्हणून केला जातो.


हिराकोट किल्ल्याच्या मजबूत बांधणीसाठी लागलेला दगड ज्या खाणीतून काढला तेथे तलाव निर्माण झाले. किल्ल्याच्या निर्मिती करताना तलावाची निर्मिती झाली म्हणून त्यालाही हिराकोट नाव पडले. याच तलाव परिसरात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.

Hirakot Lake
Alibagh :नागरिकांनो आणि जपून वापर; उमटे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठा

कुलाबा जिल्‍ह्याचे पहिले कलेक्टरपासून आताचे जिल्‍हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्यापर्यंत सर्वांचेच वास्‍तव्य या ठिकाणी होते. तलावाच्या परिसरातच सरकार दरबारी न्याय मागण्यासाठी आंदोलकांची निदर्शने, उपोषणे सुरू असतात. सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी हा परिसर नेहमी गजबजलेला असतो.

पूर्वी अलिबागपर्यंत प्रवास करण्यासाठी वाहनसुविधा नव्हती तेव्हा जिल्हाभरातून दरमजल करीत आलेले नागरिक याच तलावाच्या परिसरात आराम करायचे, बरोबर आणलेली चटणी-भाकरी खाऊन ताजे झाल्यावर साहेबाला भेटायला जायचे.

साहेब भेटला नाही तर वस्ती करून दुसऱ्या दिवशी भेटण्याचा प्रयत्न करायचे. यासाठी हा तलावच गोरगरिबांना मुख्य आधार वाटायचा. आजही हिराकोट तलावाचे अस्‍तित्‍व अबाधित आहे.

Hirakot Lake
Wagholi Accident News : चाकाखाली आल्याने वाघोलीत तरुण ठार

पर्यटकांचे मुख्य आकर्षण


समुद्राकिनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या तलावात गोडे पाणी आहे. तळ्याभोवती नगरपालिकेने काही वर्षांपूर्वी सुशोभीकरण केले आहे. येथे काही प्रमाणात अलिबाग व सभोवतालच्या ऐतिहासिक घटनांचीही नोंद दिसते. तळ्यामध्ये वर्षभर पाणी उपलब्ध असते.

१५ ऑगस्ट व २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला येथे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. पर्यटकांसह स्‍थानिकांची विशेषतः महिलांची रात्रीच्या वेळी फिरण्याचे सुरक्षित ठिकाणी म्‍हणूनही हिराकोट तलावाला पसंती मिळत आहे.

जिल्ह्याचे मुख्यालय


जिल्‍ह्याचे मुख्यालय असलेले अलिबाग हे शासकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. महत्त्वाची कार्यालये हिराकोट तलाव परिसरातच आहे. तलावाजवळ समुद्रकिनारी एक सुंदर उद्यान विकसित करण्यात आले आहे.

Hirakot Lake
Alibagh :नागरिकांनो आणि जपून वापर; उमटे धरणातून दिवसाआड पाणीपुरवठा

समुद्रकिनाऱ्यावरील रम्य संध्याकाळ येथून खूप छान अनुभवता येते. या पूर्वी अलिबाग शहराची वस्ती हिराकोट तलावाजवळच्या रामनाथ भागात होती. आजही तिथं असलेला हिराकोट तलाव ही अलिबागकरांच्या विरंगुळ्याचे, फिरण्याचे ठिकाण आहे. इथेच कान्होजी आंग्रेंनी भुईकोट किल्ला १७२० च्या सुमारास बांधला.

मराठा आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी १६९८ मध्ये अलिबाग शहराची नव्याने उभारणी सुरू केली. त्यापूर्वी अलिबाग शहराची वस्ती हिराकोट तलावाजवळच्या रामनाथ भागात होती. आजही तिथं असलेला हिराकोट तलाव ही अलिबागच्या नागरिकांसाठी विरंगुळ्याची हक्काची जागा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेले हिराकोट तलावाबाबत अलिबागकरांच्या मनात भावनिक बंध निर्माण झाले आहेत.


- वसंत चौलकर, रामनाथ, अलिबाग

Hirakot Lake
वसई-अलिबाग मेट्रो लवकरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()