narali pournima history
narali pournima historyesakal

Narali Pournima: एक नारल दिलाय दर्या देवाला..! नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी, काय आहे नारळी पौर्णिमेचा इतिहास ?

Narali Pournima History: श्रावणी पौर्णिमेपासून मासेमारीचा खरा हंगाम सुरू होत असल्‍याने कोळीबांधव हा दिवस धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून उत्साही वातावरणात साजरा करतात.
Published on

अलिबाग, ता. १९ : ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला, वरसाचा मान देव दर्या देवाला’ असे साकडे घालत ढोल-ताशांच्या गजरात सोमवारी कोळीबांधवांनी आपल्या लाडक्या दर्याराजाला सोन्याचा नारळ अर्पण केला. पारंपरिक पोषाखातील महिलांनी लोकगीतांवर धरलेल्या ठेक्याने समुद्रकिनारे फुलून गेले होते. कोकण किनारपट्टीवरील लोकजीवन समुद्रावर अवलंबून असल्याने हा सर्वात भावनिक सण मानला जातो. समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या आपल्या भर्ताराला सुखरूप ठेवण्यासाठी आणि त्‍याला भरभरून मासळी मिळावी, यासाठी महिला दर्याराजाला साकडे घालतात.

यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही प्रमुख सण श्रावणातील सोमवारी आल्याने सर्वत्र धार्मिक वातावरण पाहावयास मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाने सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. भावाला राखी बांधण्यासाठी बहिणी घराबाहेर निघाल्याने रस्त्यावर वर्दळ होती. तर शाळा, महाविद्यालयांमध्ये शनिवारीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला; मात्र जिल्ह्यातील कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी रविवारपासूनच सुरू होती.

दर्याराजाला अर्पण करण्यासाठी नारळाचे मोदक, करंज्या यांसारखे पदार्थ बनवण्यात महिला वर्ग दंग होत्या, तर मिरवणुकीची तयारी करण्यात पुरुष मंडळी व्यस्त होती.
सोमवारी सायंकाळी गावागावांतील महिला पारंपरिक वेशभूषेत समुद्राकडे निघाल्या. महिला मंडळाच्या एकाच रंगाच्या साड्या, गळ्यात सोन्याचे दागदागिने, हातभर बांगड्या आणि कोळी नृत्यावर विशिष्ट पद्धतीचा ठेका धरत निघाल्या होत्या. श्रावणी पौर्णिमेपासून मासेमारीचा खरा हंगाम सुरू होत असल्‍याने कोळीबांधव हा दिवस धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून उत्साही वातावरणात साजरा करतात.

नारळी पौर्णिमेचा इतिहास

भारतीय पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या कोळी समाजाने समुद्रदेवतेची पूजा करण्याची परंपरा सुरू केली आहे. प्राचीन काळात मासेमारी हा मुख्य व्यवसाय होता आणि समुद्रदेवतेच्या पूजेला विशेष महत्त्व होते. नारळी पौर्णिमा हा सण समुद्रदेवतेच्या पूजेचा एक भाग म्हणून साजरा केला जातो. मासे हे कोकणातील लोकांच्या जेवणातील प्रमुख खाद्यपदार्थ. प्राचीन काळात मासेमारी करणाऱ्या समाजांनी समुद्रदेवतेची पूजा करण्याची परंपरा जपली. समुद्राच्या लाटांमुळे मासेमारीची आव्हाने आणि संकटे येतात, खवळलेल्‍या समुद्राची पूजा केल्‍यास तो शांत होतो आणि भरभरून समृद्धी देतो, असे मानले जाते.

नारळांच्या किमतीत वाढ

नारळी पौर्णिमेनिमित्त खोबऱ्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. घराघरांमधून दर्याला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. यामुळे सध्या नारळाच्या किमती जवळपास २० ते २५ टक्‍क्‍यांनी वाढल्‍या आहेत. दहा दिवसांपूर्वी मध्यम आकाराचा नारळ २० रुपयाला मिळायचा, आता त्याची किंमत ३० ते ४९ रुपये झाली आहे. नारळफोडीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाड करवंटीच्या नारळांच्या किमतीही वाढल्‍या आहेत.

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा, नागाव, किहीम येथे नारळफोडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात; मात्र या स्पर्धांकरिता अनेकांकडे जाड करवंटीचे नारळच शिल्लक राहिले नव्हते. संदेश राऊळ सांगतात, स्पर्धेसाठीचे नारळ किमान ५०० रुपयाला विकले गेले. अनेकांना शोधूनही असे नारळ सापडले नाहीत. असे दरवर्षी होत असल्याने अनेकजण खास स्पर्धांसाठीच्या नारळांचा शोध वर्षभर घेत असतात. यावर्षी जास्तच टंचाई जाणवत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()