Maratha Reservation: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर होणार मनोज जरांगे पाटलांची सभा
Maratha Reservation: मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर दिवाळी झाल्यावर जरांगे पाटील रायगड दौऱ्यासह राज्यभर दौरा करणार आहेत. २० नोव्हेंबर रोजी खोपोलीत त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे नेते डॉ. सुनील पाटील यांनी केले आहे.
सभेसाठी खोपोली- खालापूर व कर्जत सकल मराठा समाज बांधवांकडून जय्यत तयारी सुरू आहे. सकल मराठा समाज बांधव रायगडच्या पदाधिकऱ्यांनी नुकतीच जरांगे-पाटलांची भेट घेत विचारपूस केली. यावेळी रायगड जिल्ह्यात सभा घेण्यासाठी जरांगे पाटील यांना आग्रह धरताच स्वराज्याची राजधानी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खोपोलीत संघर्ष योद्धा शिवश्री मनोज जरांगे- पाटील यांच्या जाहीर सभेच्या तयारी बाबत माहिती देण्यासाठी सकल मराठा समाज बांधव रायगडच्या पदाधिकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १०) श्रीराम मंगल कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
या वेळी सकल मराठा समाज रायगड जिल्ह्यातील राज्य समन्वयक विनोद साबळे (पनवेल), उत्तम भोईर, उल्हासराव देशमुख, शंकरराव थोरवे, गणेश कडू, राजेश लाड, नितीन मोरे आदी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर १५ नोव्हेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू होणार आहे. खोपोली शहरातील चिंचवली-लौजी येथील मैदानात सोमवारी (ता.२०) दुपारी सभा होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.