Mumbai
Mumbaisakal

Mumbai : देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचे होणार सुशोभीकरण; गोरेगाव स्थानकाचा प्लॅटफॉर्म उंच करण्यासाठीही प्रयत्‍न...

कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड, माणगाव व वीर तर रत्नागिरीतील पाच व सिंधुदुर्गमधील चार स्थानकांचे सुशोभीकरण करण्याकरिता रेल्वेने सामंजस्य करार केला आहे.
Published on

महाड - देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण होणार असून यात राज्य सरकारच्या वतीने रायगड जिल्ह्यातील कोलाड, माणगाव व वीर या स्थानकांचे सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. यासाठी जवळपास अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Mumbai
Mumbai News: इन्स्टाग्रामवर पाकच्या स्वातंत्र्यदिनाचं ठेवलं स्टेटस, दोन विद्यार्थ्यांना मुंबईत अटक!

कोकण रेल्वे मार्गावरील रायगड जिल्ह्यातील कोलाड, माणगाव व वीर तर रत्नागिरीतील पाच व सिंधुदुर्गमधील चार स्थानकांचे सुशोभीकरण करण्याकरिता रेल्वेने सामंजस्य करार केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून ५६ कोटींच्या विकास कामांना मंजुरीही मिळाली आहे.

Mumbai
Mumbai News : अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा भरण्याच्या स्थितीत; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार

नुकताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सुशोभीकरणाच्या कामाचा ऑनलाईन शुभारंभ केला. या वेळी महाड एम‌आयडीसी रेल्वे मार्गासाठी प्रयत्न करणार असल्‍याचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.

वीर स्थानकावर एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी तर गोरेगाव स्थानकाचा प्लॅटफॉर्म उंच करण्यासाठीही प्रयत्‍न करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.