‘पत्रकारांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे’
महाड , ता. ३ (बातमीदार) : बातमीच्या मागे धावणाऱ्या पत्रकारांवर मोठ्या प्रमाणात मानसिक ताण असतो. त्यामुळे कुटुंबाच्या हितासाठी त्यांनी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे यांनी केले. महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीने पत्रकारांसाठी संवाद सन्मान कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या वेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत कदम, सीएसआर विभागाच्या प्रमुख माधुरी सणस, कंपनी व्यवस्थापक संदीप काशीद, सुरक्षा आणि पर्यावरण विभाग प्रमुख आप्पासाहेब गजभार, कंपनीचे माध्यम सल्लागार जीवराज चोले आदी उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात २५ वर्षे कार्यरत असलेले काळोखे यांनी आपल्या वाटचालीतील अनुभव कथन केले. अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केले असले तरी माणसाने माणुसकी विसरणारे होता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. मुख्य व्यवस्थापक उमाकांत कदम यांनी, कंपनीने जागतिक स्तरावर रंग निर्मिती क्षेत्रात कामगिरी करताना सामाजिक बांधिलकीही जोपासल्याचे सांगितले. सीएसआर विभागाच्या प्रमुख माधुरी सणस यांनी, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शाश्वत विकास, महिलांचे सबलीकरण, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण पाणी समस्या इत्यादी महत्त्वपूर्ण विषयाकडे लक्ष देऊन कंपनी काम करत असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.