Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात लाखोंचे मद्य केले जप्त

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात लाखोंचे मद्य केले जप्त

Published on

Mahad News: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडक कारवाई सुरू केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते २२ एप्रिल या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये एक लाख १२ हजार ८७२ लिटर दारू व १३ वाहने जप्त करण्यात आली आहे. हस्‍तगत केलेल्‍या या मुद्देमालाची किंमत सुमारे ७१ लाख रुपये इतकी आहे.(mahad News)


अवैद्य मद्य वाहतूक, शस्‍त्र बाळगल्‍याप्रकरणी जिल्ह्यात एकूण २५७ गुन्हे नोंदवण्यात आले असून २५६ आरोपींना अटक केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १४५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर ४५ लाख ३९ हजार ४१५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर मावळ मतदारसंघात एकूण ११२ गुन्हे नोंद करण्यात आले असून २६ लाख ४७ हजार ४२६ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्‍तगत करण्यात आला आहे. याशिवाय ५९६ संशयित व सराईत गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात आल्‍या आहेत. (raigad Crime )

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात लाखोंचे मद्य केले जप्त
Mumbai Local News: गोरेगाव जलद लोकल रद्द करण्याचा घाट; महिला प्रवाशांनी राबविली स्वाक्षरी मोहीम!

अवैध मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या सराईत व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण २२१ प्रस्ताव लोकसभा मतदारसंघातील उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे रायगड जिल्ह्यात एकूण १० मद्यविक्री परवाने पुढील आदेश मिळेपर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची सात पथके तैनात असून आंतरराज्‍य मद्य तस्करी रोखणे, हातभट्टीवर दारू निर्मितीबरोबरच विक्री केंद्रावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच कोणत्याही प्रकारची अवैध मद्य वाहतूक होणार नाही, याकरिता रायगड जिल्ह्यात खालापूरमधील शेडुंग, पेणमधील खारपाडा, पोलादपूरमधील चांढवे येथे तीन तपासणी नाके उभारण्यात आले असून संशयित वाहनांची सखोल तपासणी करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणारे ढाबे, हॉटेल, टपऱ्यांवर वारंवार कारवाई करण्यात येत आहे.


निवडणूक कालावधीत गोवा राज्यातून मद्याची चोरटी वाहतूक होण्याची शक्यता असल्याने कोलाड येथे रो-रो रेल्वे सेवेद्वारे येणाऱ्या वाहनांची पोलिस विभाग व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून तपासणी करण्यात येत आहे.

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात लाखोंचे मद्य केले जप्त
Old Mumbai-Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

जिल्हयात आचारसंहिता कालावधीत सर्व मद्य उत्पादक, ठोक विक्री व किरकोळ विक्री परवानाधारक यांच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याकरिता या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

रायगड मतदारसंघात मतदारांना दारूचे प्रलोभन देत असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच अवैध मद्य निर्मिती व विक्रीबाबत काही तक्रारी असल्यास विभागाचा व्हॉटसॲप क्रमांक ८४२२००११३३, टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ व रायगड अधीक्षक कार्यालय दूरध्वनी क्रमांक ०२१४१-२२८००१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आर.आर. कोले यांनी केले आहे.

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाने महिनाभरात लाखोंचे मद्य केले जप्त
Mumbai News: मालकांकडे पैसे नसल्यामुळे त्या इमारती सरकारने ताब्यात घेतल्या; सर्वोच्च न्यायालयाचे मत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.