अर्धवेळ केलेल्या कामाची दखल निवृत्तीचे वेतन ठरविताना घ्यावीत नागपूर खंडपीठाचा निकाल

अर्धवेळ केलेल्या कामाची दखल निवृत्तीचे वेतन ठरविताना घ्यावीत नागपूर खंडपीठाचा निकाल

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : सरकारी नोकरीमध्ये कायम झाली नसताना ग्रंथपाल असलेल्या महिला कर्मचाऱ्याने अंशतः तत्त्वावर अर्धवेळ केलेल्या कामाची दखल तिचे निवृत्तीचे वेतन ठरविताना घ्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार अर्धवेळ सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवेतील पन्नास टक्के कालावधी हा निवृत्तिवेतन आणि अन्य आर्थिक भत्तेसाठी लागू होतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकालही दिले आहेत. या निकालांचा दाखला यावेळी याचिकादारांकडून देण्यात आला. न्या. रोहित देव यांच्या खंडपीठानेदेखील हा युक्तिवाद मान्य करत याचिकादाराची मागणी मंजूर केली. याचिकादाराने सुमारे सोळा वर्षे दहा महिने अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम केले होते. यापैकी पन्नास टक्के अवधी जर तिच्या सेवेत कायम झालेल्या कालावधीत समाविष्ट केला, तर तिची सेवा बारा वर्षे होते, जी पेन्शन मिळण्यासाठी पात्र आहे, असे म्हणणे याचिकादारांनी मांडले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.