mumbai
mumbai sakal

Rakshabandhan : वेड्या बहिणीची वेडी ही माया

कोविड काळात किरणने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. दीड वर्षापूर्वी नोकरी नव्हती म्हणून मित्रासोबत इंटरनेट कनेक्शनचे काम करताना उच्च विद्युत दाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने किरणला विजेचा धक्का बसला.
Published on


मुंबई - रक्षाबंधनाचे महत्त्व हात गमावलेल्या त्या प्रत्येक बहीण-भावाला सर्वाधिक असते. मात्र, अशा परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते. पुण्याच्या रिहे (मुळशी) या ग्रामीण भागात राहणाऱ्या किरण गजरमल या २९ वर्षीय तरुणाने दीड वर्षापूर्वी अपघातात दोन्ही हात गमावले.

कोविड काळात किरणने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. दीड वर्षापूर्वी नोकरी नव्हती म्हणून मित्रासोबत इंटरनेट कनेक्शनचे काम करताना उच्च विद्युत दाबाच्या वाहिनीच्या संपर्कात आल्याने किरणला विजेचा धक्का बसला. तेव्हा तो जागीच बेशुद्ध झाला. त्यानंतर मित्रांनी त्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले. या अपघातात किरणचे दोन्ही हात आणि डावा पाय निकामी झाला. ससून रुग्णालयात पहिली शस्त्रक्रिया करून नसांची तपासणी करण्यात आली, तिथे त्याला डॉक्टरांनी हात प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता, पण त्यासाठी किमान एक वर्ष थांबावे लागणार असल्याचे सांगितले होते.

ऑनलाईन प्रत्यारोपणाची घेतली माहिती
हाताच्या जखमा पूर्ण भरल्यानंतर काही महिन्यांपूर्वी किरण आणि त्यांची बहीण शीतल मोरे या दोघांनी हात प्रत्यारोपणासंदर्भातील ऑनलाईन माहिती मिळवली. त्यात केईएम रुग्णालयासह अन्य दोन-तीन रुग्णालयांची माहिती ऑनलाईन उपलब्ध झाली.

बहिणीच्या पुढाकाराने केईएम रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर किरण आणि त्यांच्या बहिणीने केईएम रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांची मंगळवारी ओपीडीत भेट घेतली.

पायाची हालचाल सुरू
६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी किरणने दोन्ही हात आणि डावा पाय गमावला. सहा महिन्यांपूर्वी किरणने आर्टिफिशियल पाय बसवून घेतला आहे. पायाची हालचाल सुरू आहे. मात्र, दोन्ही हात गमावल्याने अनेक गोष्टी करताना किरणला कुटुंबीयांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आता हात प्रत्यारोपणाचा पर्याय असल्याने किरणच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे.

राहुल अहिरवारची प्रेरणादायी भेट
काही वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयात हाताचे यशस्वी प्रत्यारोपण झालेला राहुल अहिरवार ही केईएम रुग्णालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने डॉक्टरांच्या भेटीस आला होता. किरणच्या बहिणीने एक महिन्यापूर्वी राहुलशी फोनवरून संपर्क साधला होता. त्याला भेटून प्रत्यारोपणाची प्रक्रिया समजून घेता यावी, यासाठी राहुल, किरण आणि शीतल तिघेही केईएम रुग्णालयात भेटले. राहुलच्या भेटीने हात प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे किरण गजरमल यांनी सांगितले.

mumbai
Beed News : जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमक्यांना कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

किरणने ओपीडीला येऊन हात प्रत्यारोपणाची इच्छा व्यक्त केली. हात प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी किरणच्या सर्व तपासण्या कराव्या लागणार आहेत. जर सर्व चाचण्या हात प्रत्यारोपणासाठी योग्य असतील तर त्याचे नाव हात प्रत्यारोपणाच्या यादीत टाकले जाईल. हात प्रत्यारोपणानंतर आयुष्यभर इम्युनोसप्रेशन औषधे घ्यावी लागतात. त्यांचे शरीर या औषधांना प्रतिसाद योग्य पद्धतीने देतात का ते पाहूनच पुढची दिशा ठरवली जाते. आमच्याकडे हात प्रत्यारोपणासाठी विचारणा होते. त्यामुळे मरणोत्तर हात दानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- डॉ. विनिता पुरी, विभाग प्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग

mumbai
Akola: ठाणेदारावर शेतकऱ्याला मारहाणीचा आरोप, पीडिताच्या पत्नीची गृहमंत्र्यांकडे तक्रार; जखमीवर उपचार

किरण हा आमच्या तिन्ही भावंडांमध्ये खूप शिकलेला आहे. आमचे आई-वडील ग्रामीण भागात राहतात. शहराशी फारसा संबंध नाही. त्यामुळे मोठी बहीण म्हणून माझे हे कर्तव्य आहे, असे मला वाटते. घरची आर्थिक परिस्थिती किरणवर अवलंबून होती, पण हात
प्रत्यारोपणाच्या पर्यायाने अनेक आशा नव्याने प्रफुल्लित झाल्या आहेत.
शीतल मोरे, किरण गजरमल यांची बहीण

mumbai
ST Bus Video : गतीमान सरकारची दुर्दैवी एसटी; हातात छत्री घेऊन चालकाला चालवावी लागतेय Bus

राहुलचे रक्षाबंधन
मध्य प्रदेशहून राहुल अहिरवार हा खास रक्षाबंधनासाठी केईएममध्ये आला असून त्याने डॉ. पुरी यांच्याकडून राखी बांधून घेतली. फक्त रक्षाबंधनासाठी आपण इथे आल्याचे राहुलने ‘सकाळ’ला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.