पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

Published on

मुंबई, ता. ९ : सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई’तर्फे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२३ राबवण्यात येणार आहे. यासाठी लाखो रुपयांची राज्यस्तरीय पारितोषिके दिली जाणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित मंडळांना अर्ज करण्याची १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पु. ल. अकादमीने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत राज्यस्तरीय आणि नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. यात राज्यस्तरीय पारितोषिक दिले जाणार असून त्यामध्ये प्रथम पारितोषिक ५ लाख रुपये; तर द्वितीय २ लाख ५० हजार आणि तृतीय पारितोषिक एक लाख रुपये इतके असणार आहे; तर जिल्हास्तरीय विजेत्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये व प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.