श्रीगणेश सजावटीतून चौपाट्या वाचवण्याचे आवाहन

श्रीगणेश सजावटीतून चौपाट्या वाचवण्याचे आवाहन

Published on

सजावटीतून चौपाट्या वाचवण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ ः मुंबईतील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असणारी दादर चौपाटी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. इतर चौपाट्यांचीही दुरवस्था झाली आहे. मुंबईतील ही समस्या लक्षात घेऊन सायन प्रतीक्षानगर येथील जान्हवी रोकडे यांनी आपल्या घरगुती गणेशाच्या सजावटीच्या माध्यमातून चौपाट्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले आहे.
रोकडे कुटुंब यंदा आपल्या घरात पर्यावरणाच्या जाणिवेचे आणि सामुदायिक जबाबदारीचे प्रतीक म्हणून गणेशोत्सव साजरा करत आहेत. यंदा त्यांनी मुंबईतील चौपाट्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. दादर चौपाटीवर सांडपाणी आणि मोठ्या प्रमाणात कचरा झाला आहे. मुंबईतील जुन्या व प्रसिद्ध असलेल्या चौपाटीच्या जीर्णोद्धारासाठी रोकडे कुटुंबीयांनी आपल्या सजावटीतून साद घातली आहे. त्यांनी वाळूच्या माध्यमातून दादर चौपाटी साकारली आहे. समुद्रकिनारा, नारळाची झाडे आणि आसपासच्या इमारती हुबेहूब साकारल्या आहेत. त्याशिवाय भेळपुरीचे स्टॉल, पुस्तकांची दुकाने, आकाशपाळणा, वाहने, इतर खेळाचे साहित्य व रेंगाळणारे घोडे लक्ष वेधून घेतात. इतकेच नाही तर चौपाटीवर पडलेला कचरा, ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या आणि विसर्जन न झालेल्या समुद्रातून किनाऱ्यावर आलेल्या मूर्तींचे विदारक चित्र हुबेहूब साकारले असून ते विचार करायला प्रवृत्त करते.

श्री गणेश विसर्जनासाठी चौपाट्यांवर नेहमीच गर्दी होते. मात्र चौपाट्यांची काळजी कुणी घेताना दिसत नाहीत. त्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून चौपाट्यांचे सौदर्य धोक्यात आले आहे. याच समस्येकडे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- जान्हवी रोकडे, आयोजक
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.