पहाटे धुके, दिवसा ढगाळ वातावरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईत रात्री थंडी आणि दिवसा उकाडा असे वातावारण असतानाच पुढील २४ तासांत वातावरणात बदलाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहाटे, सकाळच्या सत्रात धुके आणि दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून, कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३ आणि २३ अंश सेल्सअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्रात आलेल्या मिन्चाँग वादळाचा परिणाम मुंबईवर दिसला नाही; मात्र तापमानात फरक जाणवला. तसेच वेतील गारवा काहीसा वाढला होता. यंदाच्या मोसमात मात्र कडक्याची थंडी राहणार नाही, असे हवामान विभागाने आधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील २४ तासांत मुंबईत सकाळी धुके; तर दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे.
मुंबईतील किमान तापमानात आज काही अंशी वाढ झाल्याचे दिसले. सांताकृझ येथे २३.६ तर कुलाबा येथे २४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. शनिवारी (ता. १६) किमान तापमान १९ अंशापर्यंत खाली गेले होते. पुढील ४८ तासात शहर आणि उपनगरात आकाश मुख्यता निरभ्र राहिल; तर कमाल आणि किमान तापमानात एखाद अंशाचा फरक जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.