सरकारचे ‘हाफकिन’च्या औषध खरेदीकडे दुर्लक्ष

सरकारचे ‘हाफकिन’च्या औषध खरेदीकडे दुर्लक्ष

Published on

सरकारचे ‘हाफकिन’च्या औषध खरेदीकडे दुर्लक्ष
- १५ कोटी रुपयांची औषधे पडून
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्य सरकारच्या आणि पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असताना सरकारचे हाफकिनच्या औषध खरेदीकडे दुर्लक्ष होत आहे. हाफकिन बायोफार्माने तयार केलेली १५ कोटी रुपयांची औषधे पडून आहेत. या औषधांची खरेदी झाल्यास रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकेल.
गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी रुग्णालयांमध्ये हाफकिनकडून औषधे जातात. त्‍यावेळी औषधांची खरेदी ही अंतर्गत खरेदी विक्री केंद्रांकडून व्हायची. मात्र महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण स्थापन केल्यानंतर एप्रिलपासून औषध खरेदी पूर्णपणे बंद झाली. फक्त मार्चपर्यंतच्या सर्व औषधांचे वाटप केले गेले. मात्र, एप्रिल २०२२ ते २०२३ पर्यंतचा निधी ‘हाफकिन’च्या औषध खरेदी विक्री केंद्रात पडून असल्याचे ‘हाफकिन’कडून सांगण्यात आले.
मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंतचा साठा देखील हाफकिन बायोफार्मामध्ये पडून आहे. यामध्ये दोन लाख सर्प दंशाची औषधे, १० लाख अँझिथ्रोमायसिन, पाच लाख मेटोफॉर्मिन आणि २० हजार कॉफेकीन खोकल्याची औषधे पडून आहेत. ही सर्व औषधे तब्बल १५ कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे सध्या हाफकिन बायोफार्माला निधीअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
प्राधिकरणाकडून औषधांची मागणी होत नाही, औषधांच्या खरेदीबाबत ‘हाफकी’न प्रशासनाने विचारले असता प्राधिकरणाकडून औषधे खरेदीसाठी निधी नसल्याचे सांगण्यात येते. तसेच मागील निधी लवकरच देणार असल्याचे आश्वासन देखील प्राधिकरणाकडून देण्यात येते. मात्र, सहा कोटींचा निधी अद्याप मिळाला नसल्‍याचे ‘हाफकिन’ने सांगितले.
हाफकीन बायोफार्मा मान्यताप्राप्त संघटनेचे मार्गदर्शक सचिन अहिर यांनी हाफकिन महामंडळात कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक नेमणूक करण्याबाबतचे पत्र राज्‍य सरकारला दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्‍याची खंत त्यांनी व्यक्त केली.

सर्पदंशावर प्रभावी लस
सर्पदंशावर ‘हाफकीन’ची लस अत्यंत प्रभावी आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि देशभरात ही सर्पदंशाची लस पाठवली जाते. गेल्या काही महिन्यांपासून या लसीची ऑर्डरच दिली नसल्याने तब्बल दोन लाख लसी पडून आहेत.

‘हाफकीन’ची उत्पादने
डायक्लोफिनॅक, ऑटोवेस्टलिन, मेटाफॉर्मिन, पेंटा प्रेजॉल, ओमी प्रेजॉल अशी उत्पादने नागरिकांना कमी खर्चात आराम देतात.
--
सर्दी, खोकल्यासाठी माफक दरात औषध
सर्दी खोकला झाल्‍यास रुग्‍णाला शेकडो रुपयांची औषधे घ्‍यावी लागतात. ‘हाफकीन’चे खोकल्याचे औषध केवळ २३, सर्दी व घसा दुखीसाठी प्रत्येक गोळी केवळ पाच रुपये एवढा कमी खर्च रुग्‍णांना येताे, असे महामंडळाचे संचालक अनंत पेडणेकर यांनी सांगितले.

पूर्णवेळ संचालक कधी?
हाफकिनला संचालक आहेत. पण ते पूर्णवेळ नाहीत. अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. त्यांनी आठवड्यातून काही दिवस ‘हाफकिन’ला यायला हवे. उलट सह्या घ्यायला ‘हाफकिन’च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे जावे लागते.

कोट -
अधिकाऱ्यांचे लक्ष हे खासगी औषध कंपन्यांच्या टक्‍केवारीकडे असल्‍याने शासनाच्या अखत्यारीत असलेल्या हाफकिनकडे दुर्लक्ष होत आहे. अशा अधिकाऱ्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे.
- गोविंदराव मोहिते,
अध्यक्ष हाफकीन बायोफार्मा मान्यता प्राप्त संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.