Thalassemia
Thalassemiaesakal

Thalassemia: राज्यात अकरा हजार रुग्ण, थॅलसेमिया ग्रस्त मुलांना मोफत रक्त देण्याची प्रशासनाची ब्लड बँकांना सूचना !

थॅलसेमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दर १५ दिवसांनी रक्त संक्रमण थेरपीसाठी रक्ताची आवश्यकता असते.
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करणे, देशातील सर्व रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे; मात्र त्यानंतरही अनेक तक्रारी पुढे येत आहेत. मध्‍य प्रदेशातील एका रक्तपेढीने रक्ताच्या बदल्यात रक्तदात्यांची मागणी केल्याची तक्रार समोर आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतली असून आयोगाने याबाबत सर्व राज्यांच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला पत्र पाठवले आहे. यानंतर, राज्य रक्त संक्रमण परिषदेने आयोगाचे पत्र सर्व रक्तपेढ्यांना पाठवत थॅलेसेमियाग्रस्त बालकांना मोफत रक्त देण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

थॅलसेमिया हा रक्ताशी संबंधित आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दर १५ दिवसांनी रक्त संक्रमण थेरपीसाठी रक्ताची आवश्यकता असते. सर्वसामान्यांना हे उपचार परवडत नाहीत. त्यामुळे, केंद्र सरकारने देशातील सर्व सरकारी आणि खासगी रक्तपेढ्यांना या रुग्णांना मोफत रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते, असे असतानाही अनेक रक्तपेढ्या थॅलसेमिया रुग्णांकडून शुल्क आकारतात किंवा रक्त व रक्तघटकांचा पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे आल्या आहेत.

याबाबत आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुंगो यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागांना पत्र जारी केले असून त्यांना सर्व रक्तपेढ्यांनी थॅलसेमिया रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची खात्री करण्यास सांगितले आहे. यासोबतच या संदर्भात योग्य कारवाईचा अहवाल नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स cp.neper@nic.in च्या ईमेलवर शेअर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


...
राज्यात खासगी आणि सरकारी मिळून २५० रक्तपेढ्या आहेत. या बँकांना याआधीच थॅलसेमिया रुग्णांसाठी महिन्यातून दोनदा रक्त युनिट आरक्षित करून डे केअर सेंटरमध्ये पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाठवणारी रक्तपेढी आणि प्राप्त करणारी रक्तपेढी (डे केअर सेंटर) यांच्यात समन्वय असावा आणि दोघांनाही रक्ताची देवाणघेवाण आणि दानाचा डेटा ठेवावा लागेल.
- डॉ. महेंद्र केंद्रे, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

राज्यात ११ हजार रुग्ण
एसबीटीसी अधिकाऱ्यांच्या मते, राज्यात अकरा हजार थॅलेसेमिया रुग्ण आहेत, ज्यात २,२०० एम.एम.आर. रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये दरवर्षी १० ते १५ रुग्ण वाढत आहेत. त्यांना दर १५ दिवसांनी रक्त चढवावे लागते. अनेक गरीब मुलांवर उपचार आणि रक्तसंक्रमणाचे काम पालिका आणि सरकारी रुग्णालयांच्या डे केअर सेंटरमध्ये सतत सुरू असते. प्रत्येक खासगी रक्तपेढीने १० युनिट ते ३० युनिट रक्त राखीव ठेवावे आणि ते दर महिन्याला जोडलेल्या रक्तपेढ्यांना द्यावे लागेल, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.