Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम

Published on


मुंबई, ता. १९ : क्षयरोगाचा (टीबी) सामना करणे हे मुंबईकरांसाठी नेहमीच आव्हान राहिले आहे. गेल्या दोन वर्षांत दरवर्षी ६० हजारांहून अधिक लोक क्षयरोगाने ग्रस्त आढळले. अशा परिस्थितीत महापालिका टीबी नियंत्रण कक्ष आता सूक्ष्म स्तरावर (स्थानिक स्तरावर) टीबी हॉटस्पॉट क्षेत्र ओळखणार आहे.(mumbai tb latest ubdate)

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम
Mumbai Crime News : मुंबईत धक्कादायक प्रकार! मृतदेहासोबत कुटुंबाने घालवले 10 दिवस; हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं...

यात हॉटस्पॉट परिसरात राहणाऱ्या लोकांची आर्थिक, सामाजिक, पोषण आणि आजारांची स्थिती देखील जाणून घेतली जाणार आहे. यामुळे भविष्यात प्रतिबंधात्मक योजना तयार करण्यासाठी याची मदत होईल आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळू शकेल, असा दावा महापालिकेने केला आहे.(total number of tb paitents)


आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०२५ पर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबई हे नेहमीच टीबीचे हॉटस्पॉट राहिले आहे. दरवर्षी पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण येतात. क्षयरोग विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत एक लाख २९ हजार २६१ जणांना क्षयरोग झाला आहे.

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम
Mumbai Crime News: मालकाच्या जेवणात विष मिसळून नोकराने पळवला 2.50 कोटींचा हिरा अन् दागिने...पण आधार नंबरमुळे झाली फजिती

क्षयरोग विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सध्या मुंबईत काही निवडक टीबी हॉटस्पॉट आहेत, ज्यांची अनेकदा चर्चा होते. आता मात्र सुक्ष्म स्तरावर हॉटस्पॉट शोधण्याची योजना आखली जात आहे.

कोणत्या भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येतात, त्याची कारणे काय आहेत, याचा शोध याद्वारे घेतला जाणार आहे. तसेच आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील किती रहिवासी आहेत आणि किती बाहेरून आले आहेत, याचाही शोध घेतला जाणार आहे.


क्षयरोग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत टीबीची लागण होण्याचे प्रमुख कारण गर्दी हे आहे. एका छोट्या घरात पाच ते सहा जण राहतात.

अशा परिस्थितीत एखाद्याला टीबीची लागण झाली तर इतरांनाही संसर्ग पसरण्याचा धोका असतो. कुपोषित लोकांना टीबी होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जे लोक आधीच आजारी आहेत त्यांनाही टीबी होण्याचा धोका जास्त असतो.

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम
Mumbai News: आमदारांवर कारवाईची हिम्मत नसेल तर गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा द्यावा: अतुल लोंढे

प्रतिबंधासाठी वॉर्ड स्तरावर धोरण


पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, लवकरच ज्या भागात अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत, अशा सूक्ष्म स्तरावर संक्रमण क्षेत्रांचा शोध घेतला जाईल. यामुळे लोकांचे पोषण, आर्थिक, सामाजिक स्थिती, आरोग्यविषयक समस्यांची माहिती मिळेल. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमी असते तेव्हा क्षयरोगाचा धोका जास्त असतो. वॉर्डातील संबंधित क्षेत्रात जेथे अधिक रुग्ण आढळतील तेथे क्षयरोग प्रतिबंधासाठी वॉर्ड स्तरावर धोरण आखले जाईल.


५० टक्के प्रकरणांची खासगी क्षेत्रातून नोंद


मुंबईसारख्या शहरात टीबी निर्मूलन हे मोठे आव्हान आहे. खासगी रुग्णालये आणि लॅबच्या मदतीने अहवाल देण्याच्या कामात आणखी सुधारणा झाली आहे. सुमारे ४० ते ५० टक्के प्रकरणे खासगी आरोग्य क्षेत्रातून नोंदवली जात आहेत. प्रत्येकाला समस्या माहीत आहे, परंतु त्यास सामोरे जाण्यासाठी धोरण आवश्यक आहे. जोपर्यंत मोठ्या आणि छोट्या स्तरावर धोरण आखले जात नाही तोपर्यंत प्रकरणे कमी करणे कठीण आहे, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम
Mumbai News : 'पीएम उषा' अंतर्गत डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाला २० कोटी रुपयांचा निधी

८२ टक्के रुग्ण बरे


डॉ. दक्षा शहा म्हणाल्या की, मुंबईत टीबीच्या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी ८५ ते ९० टक्के लोक त्यातून बरे होतात. यासाठी नियमित औषधे घेणे आणि पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे.

या भागात सर्वाधिक प्रादूर्भाव


क्षयरोग विभागातील एका डॉक्टरने सांगितले की, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये टीबीचे प्रमाण अधिक आहे. गोवंडी, मालाडच्या मालवणी आणि धारावीमध्ये टीबीचे रुग्ण अधिक आढळत आहेत.

रुग्णांची संख्या


२०२३ : ६३,६४४
२०२२ : ६५,६१७
२०२१ : ५८,२२१
२०२० : ४३,२४४

Mumbai News: टीबीचे वाढते प्रमाण पाहता मनपाने हाती घेतली 'ही' मोहीम
Mumbai News: आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.