Maharashtra Politics
Maharashtra Politicssakal

Maharashtra Politics: महाविकास आघाडीच्या बैठकीत ठोस निर्णय नाही

मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतची भूमिका विचारण्यात आली होती. मात्र, त्यावरही आघाडीकडून काही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
Published on


Mumbai News: महाविकास आघाडीची आज लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठक झाली. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते; मात्र या बैठकीत ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: महायुतीत कोणाला किती जागा मिळणार? ५ मार्चला होणार फैसला

तसेच जागावाटपाबाबत पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतची भूमिका विचारण्यात आली होती. मात्र, त्यावरही आघाडीकडून काही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.(mahavikas aghadi seat Shareing )


‘वंचित’कडून पाच जागांची मागणी


बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी अकोला, दिंडोरी, अमरावती, सोलापूर, रामटेक या पाच जागांची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे; तर महाविकास आघाडीकडून वंचितला दोन जागा देण्याबाबत एकमत झाले आहे. त्यात आणखीन एका जागेची भर पडू शकते, असेही सांगण्यात येत आहे.(mumbai news )

Maharashtra Politics
Maharashtra Politics : Mahayuti आणि MVA चं जागा वाटपाचा घोळ कायम | BJP | NCP | Shivsena

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.