Mumbai Pollution
Mumbai Pollutionsakal

Mumbai Pollution News: मुंबईचे प्रदूषण झाले कमी, ‘ग्रीन झोन’मध्ये दाखल

परिसरात प्रदूषणाची नोंद झाली नसल्याने या वेळी मुंबई ‘ग्रीन झोन’मध्ये दाखल झाली आहे.
Published on

Mumbai News: मुंबईत प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतचा आहे. यामुळे आजार वाढले आहेत. दिल्लीपाठोपाठ देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून मुंबईची ओळख निर्माण होत आहे. यामुळे मुंबई महानगरपालिकेने पावले उचलत कठोर नियम बनवले होते

हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला असून ११५ गुणवत्ता निर्देशांकासह समाधानकारक हवेची नोंद झाली आहे; तर वरळीत सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद झाली आहे. कोणत्याही परिसरात प्रदूषणाची नोंद झाली नसल्याने या वेळी मुंबई ‘ग्रीन झोन’मध्ये दाखल झाली आहे.(mumbai pollution news)

Mumbai Pollution
Navi Mumbai Pollution: तुर्भे येथील केमिकल कंपनीमुळे वायू प्रदूषण; परिसरातील कामगार त्रस्‍त

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘समीर’ ॲपवर दर्शवलेल्या नोंदीनुसार संपूर्ण मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ११५ इतका नोंदवला आहे. वरळी येथे ४४ हवा गुणवत्ता निर्देशांकासह ‘उत्तम’ स्तर दर्शवत सर्वाधिक स्वच्छ हवेची नोंद झाली आहे.

त्याखालोखाल कुलाबा ५३, भायखळा ७४, विलेपार्ले ७४, मुलुंड ८१, सीएसएमटी ८९, शिवडी ९१, भांडुप ९२, कुर्ला ९८, पवई ९८ हवा गुणवत्ता निर्देशांकासह ‘मध्यम’ हवेची नोंद झाली आहे.(rate of pollution in mumbai)

Mumbai Pollution
Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

कांदिवली १२३, अंधेरी १२९, बीकेसी १३७, घाटकोपर १४१, सायन १६३, बोरिवली ११७, माझगाव १९२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली आहे.
वरीलपैकी बहुतेक परिसरात बऱ्याचदा हवेचा स्तर खालावलेला दिसतो.

आज मात्र त्यातदेखील सुधारणा झाल्याचे दिसते. मुंबईतील कोणत्याही परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेलेला नाही. कोणत्याही परिसरात हवेचा स्तर वाईट नोंदलेला नाही. सध्या समुद्राकडून हवा सुटल्याने धुळीचे कण वाहून जाण्यास मदत होत आहे.

Mumbai Pollution
Mumbai Pollution: पुन्हा उंचावली मुंबईच्या प्रदूषणाची पातळी; भायखळा रेड झोनमध्ये

नियमावली लागू


मुंबईत वाढत्या प्रदूषणामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले. यानंतर अनेक प्रदूषण करणाऱ्या बांधकाम साईट आणि कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

मुंबई महापालिकेनेदेखील नियमावली करत अनेक बांधकाम प्रकल्पांना नोटिसा बाजवल्या होत्या. दरम्यान, काहींनी ही नियमावली लागू केली आहे. त्यानंतर आता मुंबईचा हवेचा स्तर सुधारत असल्याचे दिसून येत आहे.(maharashtra news)

Mumbai Pollution
Navi Mumbai Pollution: वायू प्रदूषणामुळे खारघरवासीयांची झोपमोड; होत आहे डोकेदुखी आणि इतर त्रास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.