shivdi tb hospital
shivdi tb hospital sakal

Mumbai News: शिवडी टीबी रुग्णालयात आता एकाच छताखाली होणार सर्व चाचण्या

Published on

Mumbai News: टीबी रुग्णांच्या चाचणीच्या नमुन्यांना आता दुसऱ्या खासगी रुग्णालयात पाठवण्याची गरज नसून एकाच छताखाली सर्व चाचण्या मोफत उपलब्ध झाल्या आहेत. महापालिकेच्या एकमेव शिवडी टीबी रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांसह आजाराचे निदान करणे सोपे झाले आहे. (shivdi hospital)

shivdi tb hospital
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

टीबी रुग्णालयात अत्याधुनिक कंटेनमेंट प्रयोगशाळा सुरू झाली असून चाचणीनंतर महत्त्वाच्या नमुन्याच्या तपासणीचा अहवाल येथेच उपलब्ध होत आहे. आधी हे नमुने हिंदुजा रुग्णालय आणि इन्फेशन या खासगी संस्थेकडे पाठवले जात होते. पूर्वी रुग्णालयातील प्रयोगशाळेत जीन एक्सपर्ट, सीबी नॅट केले जात होते.

पण एलपीए, स्पुटम, कल्चरच्या चाचण्यांचे नमुने हिंदुजा रुग्णालयात पाठवले जायचे. कझ्युमेबल उपलब्ध होत नसल्याने नमुने तिथे पाठवले जात होते, पण आता सर्व महागड्या आणि अत्याधुनिक चाचण्या रुग्णालयाच्या नव्या प्रयोगशाळेत केल्या जातात. डीएसटी, ट्रू- नॅट, जीन एक्सपर्ट, एलपीए (लाईन प्रोब असाय) या सर्व तपासण्या येथेच होतात. दिवसाला ८० ते ९० नमुने या प्रयोगशाळेत निदानासाठी पाठवले जातात. फक्त टीबी रुग्णालयाच्याच नाही तर आजूबाजूला असणाऱ्या रुग्णालयांतील रुग्णांचे नमुने तपासणीसाठी येथे पाठवले जातात.

shivdi tb hospital
Mumbai Local News: फलाट गाठण्यासाठी प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

टीबी रुग्णालयातील कंटेनमेंट प्रयोगशाळा बांधकामासाठी काही वेळ बंद होती. मात्र, आता ही प्रयोगशाळा सुरू झाली असून रुग्णांना आणि रुग्णालय प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत टीबी रुग्णालयाला लागणारे घटक, वस्तू, साहित्य आणि मशीन उपलब्ध होत आहेत. यातून टीबीच्या मार्गदर्शक तत्त्वांद्वारे तपासणी शक्य झाली आहे. सध्या १६ मॉड्युलचे जीन एक्सपर्ट वापरात आहे.

या चाचण्या सुरू


अत्याधुनिक प्रयोगशाळेसाठी बंगळुरूहून प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. कल्चर चाचणी ही टीबीच्या जंतूंवर केली जाते. कल्चर चाचणी सात दिवसांपासून सुरू झाली आहे, तर ‘लाईन प्रोब असाय’ या चाचणीत नमुन्यांचे जेनेटिक स्टडी केले जाते आणि टार्गेट जीन शोधले जातात. तसेच संक्रमण किती आहे हे शोधले जाते. ही चाचणी तीन महिन्यांपासून सुरू झाली आहे. डीएसटी-ड्रग सेंसिटिव्‍ह टेस्ट हीदेखील सुरू झाली आहे. बॅक्टेरिया कोणत्या ड्रगने मरतो हे या तपासणीत तपासले जाते.

shivdi tb hospital
Mumbai News: पाण्याच्या टाकीला जर झाकण लावलं असतं तर म्हणत फुटला आईचा बांध

‘आयआरसीयू’ला डॉक्टर कधी मिळणार?


आयआरसीयू म्हणजेच इंटेसिव्ह रेस्परेटरी केअर युनिटमध्ये टीबी आणि इतर श्‍वसन विकाराच्या आजारावरील रुग्णांसाठी १० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विभागात काम करण्यासाठी इंटेन्सिव्हिस्ट आणि विशेष डॉक्टरांची गरज आहे. मात्र, निवड प्रक्रिया राबवून देखील आतापर्यंत एकही इंटेन्सिव्हिस्ट इथे उपलब्ध झालेले नाही. अजूनही २८ डॉक्टरांची पदे रिक्त असून मनुष्यबळाची कमतरता आहे. तीन महिन्यांपूर्वी यासह प्रस्ताव देण्यात आला आहे. विभागात अनुभवानुसार इंटेन्सिव्हिस्टसाठी सव्वा ते दोन लाख महिना पगार आणि एमबीबीएस डॉक्टरांसाठी ९० हजारांपेक्षा जास्त पगार देण्याचे ठरवले आहे.

shivdi tb hospital
Mumbai News: आदिवासींच्या जमीनी बळकावणं येणार फिल्मसिटीच्या अंगाशी? उच्च न्यायालयाने चांगलेंच फटकारले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()