मुंबईत ४८ तासांत 
मॉन्सूनचे आगमन

मुंबईत ४८ तासांत मॉन्सूनचे आगमन

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मॉन्सून मुंबईच्या वेशीवर दाखल झाला असून सिंधुदुर्ग, रायगडमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत ४८ तासांत म्हणजेच सोमवारी मॉन्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळपासूनच मुंबई परिसरात पाऊस सुरू होण्याची शक्यता असून त्यानंतर सलग आठवडाभर जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी आणि रात्री हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५ अंश आणि २८ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
.......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.