JJ School of Art
JJ School of Artsakal

Higher Education : सर्वात कमी शुल्कांमध्ये घेता येणार पेंटिंग, आर्किटेक्चरचे उच्च शिक्षण

वास्तूकला आणि फाईन आणि कमर्शिअल आर्टमधील पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण देशासह राज्यातील विद्यार्थ्यांना अतिशय कमी शुल्कात मुंबईत नव्याने स्थापन झालेल्या ‘डी-नोव्हो’ या अभिमतस्तरावरील विद्यापीठात मिळणार आहे.
Published on

मुंबई - वास्तूकला आणि फाईन आणि कमर्शिअल आर्टमधील पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण देशासह राज्यातील विद्यार्थ्यांना अतिशय कमी शुल्कात मुंबईत नव्याने स्थापन झालेल्या ‘डी-नोव्हो’ या अभिमतस्तरावरील विद्यापीठात मिळणार आहे. त्यासाठीचा अहवाल विद्यापीठाकडे सादर करण्यात आला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षातच त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्य कला संचालनालयाच्या अंतर्गत जेजेमधील वास्तूकला आणि फाईन आणि कमर्शिअल आर्टची महाविद्यालयांना वेगळे स्थापन झालेल्या ‘सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाईन’ (अभिमतस्तरावरील डी-नोव्हो विद्यापीठ) या विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तरच्या शिक्षणासाठी आठ ते १२ लाखांपर्यंतचे शुल्कचा प्रस्ताव यूजीसीसह केंद्रीय संस्था आणि सरकारकडे सादर केला होता. या विद्यापीठाकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कचे वास्तव ‘सकाळ’ने मांडले होते. या वृत्ताची शासनानेही दखल घेतली होती.

तसेच, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे शुल्क आटोक्यात आणण्यासाठीच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण सचिवांसह डी-नोव्होचे कुलगुरू डॉ. कामत यांना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कामत यांनी निवृत्त न्यायाधीश एम.एन. गिलानी यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांनी समिती गठित केली होती. त्या समितीने विद्यापीठाकडे आपला नवीन शुल्क रचनेचा अहवाल सादर केला असल्याची माहिती अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली.

खासगीच्या तुलनेत सर्वांत कमी शुल्क
जे.जे.च्या डी-नोव्होमधील सर्वच अभ्यासक्रमांचे शुल्क हे राज्यात आणि देशातील इतर खासगी संस्थांच्या तुलनेत अत्यंत कमी असेल. मागील शंभर वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जे.जे. कला संचालनालयातील शिक्षणाचा वारसा यामुळे पुढे कायम राहणार आहे.

अशी आहे नवीन शुल्क रचना
पदवी अभ्यासक्रम (कालावधी ४ वर्षे)
अभ्यासक्रम शुल्क

बीएफए - पेंटिंग - ७,५००
बीएफए - स्क्लप्चर - ७,५००
बीएफए - सिरॅमिक्स - ७,५००
बीएफए - इंटेरियर डेकोरेटर - ७,५००
बीएफए - टेक्स्टाईल डिझाईन - ७,५००
बीएफए - मेटल वर्क - ७,५००
(राखीव वर्गासाठी - ४,५००)

बी.आर्च. (५ वर्षे ) - १७,४८२
(राखीव वर्गासाठी - ९,४८२)
अप्लाईड आर्ट (४ वर्षे ) - ७,५००
(राखीव वर्गासाठी - ४,५००)

पदव्युत्तर अभ्यासक्रम (२ वर्षे)
एम.एफ.ए. - १०,५००
एम.एफ.ए.- पेंटिंग - १०,५००
एम.एफ.ए.- स्क्लप्चर - १०,५००
एम.एफ.ए.- सिरॅमिक्स - १०,५००
एम.एफ.ए.- इंटेरियर डेकोरेटर - १०,५००
एम.एफ.ए.- टेक्स्टाईल डिझाईन - १०,५००
एम.एफ.ए.- मेटल वर्क - १०,५००
(राखीव वर्गासाठी - ६,५००)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.