Protein Supplements: बॉडी बिल्डिंगसाठीच्या सप्लिमेंट पावडरमध्ये अमिनो ॲसिड, मुंबईत कंपनीला ग्राहक न्यायालयाचा दणका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१७ : बॉडी बिल्डिंगसाठी खाण्यात येणाऱ्या सप्लिमेंट पावडरमध्ये अज्ञात अमिनो ॲसिडचा वापर करणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. अशी उत्पादने चिंताजनक असून त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम नाकारता येत नाहीत, असे स्पष्ट करत आयोगाने संबंधित कंपनीला ३६,४०९ रुपयांचा दंड ठोठावला.
तक्रारदार ग्राहक हा व्यायाम करत असून त्याने बिग मसल्स कंपनीकडून १,५९९ रुपयांना ‘व्हे प्रोटीन’ पावडर ऑनलाइन विकत घेतले. कंपनीने जाहिरातीत असे म्हटले होते की, ‘‘यात साखरेचे प्रमाण अजिबात नसून २४ ग्रॅम प्रोटिनचे प्रमाण आहे; मात्र, कंपनीने केलेल्या भ्रामक दाव्यांबद्दल तक्रारदाराने या पावडरची प्रोटीन आणि अमीनो प्रोफाइल चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात अज्ञात अमिनो ॲसिडचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास येताच तक्रारदाराने ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेत दाद मागितली.
तपासणी अंती या प्रथिने पावडरच्या सेवनामुळे डोकेदुखी, पुरळ, मळमळ आणि अतिसार यांसारखे अल्पकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. याशिवाय हृदयाच्या समस्या आणि यकृताचे नुकसान यासारखे काही दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात, असे आदेशात नमूद करत आयोगाने कंपनीला दंड ठोठावत ते पैसे तक्रारदाराकडे सुपूर्द करण्यास सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.