मुंबई
Mumbai : डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्लूने मुंबईकर हैराण; प्रत्येक घरात आढळले रुग्ण, महापालिकेचा उंदीर मारण्यावर भर
Mumbai Municipal Corporation : पावसाळी आजारांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. प्रत्येक घरात सध्या सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे रुग्ण आढळत आहेत.
Summary
गेल्या महिन्यात जुलैमध्ये डेंगीचे ५३५, मलेरियाचे ७९७, गॅस्ट्रोचे १,२३९, लेप्टोचे १४१, स्वाईन फ्लूचे १६१, चिकनगुनियाचे २५ आणि हिपॅटायटीसचे १४६ रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबई : पावसाळी आजारांनी मुंबईकरांना हैराण केले आहे. प्रत्येक घरात सध्या सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर भार पडला असून डेंगी, मलेरिया, स्वाईन फ्लू (Dengue, Malaria, Swine Flu Disease) आणि गॅस्ट्रोची समस्या नागरिकांमध्ये वाढली आहे.