Mhada Mumbai Lottery 2024
Mhada Mumbai Lottery 2024Sakal

Mhada Lottery 2024 Mumbai: म्हाडाच्या लॉटरीकडे मुंबईकरांची पाठ, काय आहे कारण?

MHADA 2,030 affordable homes in Mumbai 2024 lottery: म्हाडाला पुनर्विकासातून मिळालेली बहुतांश घरे मुंबई शहरात असून अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील असूनही त्यांची किंमत दोन-अडीच कोटींच्या घरात आहे
Published on

Mumbai Mhada Lottery 2024

मुंबई : सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने २०३० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे, मात्र मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवली असून गेल्या १७ दिवसांत केवळ २१ हजार ४२१ अर्ज म्हाडाकडे आले आहेत, तर १४ हजार ८२ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली कमी घरे, अल्प-मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या कोटींच्या घरात असलेल्या किमती आणि अर्ज भरण्याची किचकट प्रक्रिया यामुळे मुंबईकरांकडून लॉटरीला थंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Mhada Mumbai Lottery 2024
Mumbai Viral Video: मुंबईत तरुणींच्या 'गँग'ची दहशत! शाळकरी मुलीला तुडवून तुडवून मारलं

म्हाडाचे घर घेण्यासाठी अर्ज भरायचा म्हणून मोठी तयारी केली होती, मात्र ऑनलाइन अर्ज भरताना डीजी लॉकर असणे आवश्यक आहे, पण सर्वसामान्यांकडे असे खाते नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे घरासाठी अर्ज कसा भरायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. -

विकास काळे, नोकरदार

Loading content, please wait...