Heart Attack, Heart Disease, Health News In Marathi
Heart Attack Reason in MarathiSakal

Mumbai News: मुंबईकरांनो हृदय सांभाळा; आठवड्याला ५० ते ६० तास काम केल्याने काय होतंय? तज्ज्ञांनी दिला इशारा

Mumbai Health News: आपल्या हृदयात तीन मुख्य धमन्या असून त्‍या संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेतात. त्‍यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि शक्ती मिळते. अशा परिस्थितीत कोणतीही धमनी बंद पडल्यास किंवा अरुंद झाल्यास रक्तप्रवाह कमी होतो.
Published on

Heart Attack Rate in Mumbai What is the Reason Health Explained

मुंबई : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, तसेच कामाच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे तरुणांमधील हृदयविकाराच्या घटनांमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. कार्यालयात आठवड्यातून ५० ते ६० तास काम केल्याने तरुणांच्या हृदयावर दाब येत असून त्यामुळे हृदयविकाराचा धोका आणखी वाढला आहे.

Heart Attack, Heart Disease, Health News In Marathi
Palghar News: आणखी एका चिमुरडीवर अत्याचार; पालघरमध्ये वडिलांचा मित्रच निघाला नराधम

जगभरात हृदयविकाराचा प्रसार वेगाने होत आहे. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेषत: जे लोक दररोज १० ते १२ तास कार्यालयामध्ये डेस्क जॉब करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका अधिक आहे. २०२३ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, ४० ते ४९ वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक होते.
बोरिवलीच्या ॲपेक्स ग्रुप ऑफ रुग्‍णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रोहीन सैनी म्हणाले की, कार्यालयामध्ये जास्त वेळ काम करणे आणि खराब जीवनशैलीमुळे तणाव निर्माण होतो. त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.

मुंबईकरांची जीवनशैली धोकादायक
डॉ. रोहीन सैनी म्हणाले की, १० ते १२ तासांच्या शिफ्ट, कामाचा प्रचंड ताण, तळलेले अन्न, जंक फूड आणि शून्य शारीरिक हालचाली आणि त्यानंतर दिवसाचे दोन ते चार तास प्रवासात घालवणे, अशी ९० टक्के मुंबईकरांची जीवनशैली आहे. विशेषतः ३५ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढत आहे. दर आठवड्याला ५० ते ६० तास काम केल्याने आणि तणावाखाली राहिल्याने आपल्या शरीरात एड्रेनालाइन वाढते.
एड्रेनालाइन हा एक हार्मोन आहे. जेव्हा आपण खूप तणावाखाली असतो, तेव्हा आपल्या हृदयाची गती वाढते. त्‍यामुळे घाम येतो. मग एड्रेनल ग्रंथी रक्तामध्ये एड्रेनालाइन हार्मोन सोडते. त्यामुळे शरीरात प्रतिक्रिया निर्माण होते. याला एड्रेनालाइन हार्मोन म्हणतात. वाढलेल्या हार्मोनमुळे हृदयाच्या धमन्या संकुचित होतात. आपल्या हृदयात तीन मुख्य धमन्या असून त्‍या संपूर्ण शरीरात रक्त वाहून नेतात. त्‍यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि शक्ती मिळते. अशा परिस्थितीत कोणतीही धमनी बंद पडल्यास किंवा अरुंद झाल्यास रक्तप्रवाह कमी होतो. त्‍यामुळे अंतर्गत सूज येते. धमनीला कोणत्याही प्रकारचे झालेले नुकसान हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत ठरते.

Heart Attack, Heart Disease, Health News In Marathi
Fasting Benefits: उपवासामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते का?

दररोज ८० लोकांना समस्या Mumbai Heart Disease
मुंबईत दररोज ७० ते ८० नागरिकांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सततच्या तणावामुळे हृदयाची लय अनियमित होते. यामुळे हृदयाच्या डाव्या कर्णिकामध्ये रक्त जमा होऊ लागते. त्यातून रक्ताची गुठळी तयार होते. ही गुठळी हृदयातून मेंदूपर्यंत जाऊ शकते आणि नंतर स्ट्रोक होऊ शकते.

ही कारणे महत्त्वाची Heart Attack Reasons in Marathi
पुरेसा व्यायाम न करणे, भरपूर प्रक्रिया केलेले आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे, धूम्रपान करणे, जास्त मद्यपान करणे आणि ड्रग्स घेणे यामुळेदेखील हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. लठ्ठपणादेखील हृदयविकाराचा एक महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()