wadala murder case
wadala murder caseesakal

Mumbai Crime: "जी. बी. रोडवर आला आणि...." समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मुलाची हत्या, देशभर जाळे पसरून आरोपी जेरबंद

Wadala boy murder: दिल्ली, प. बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब-हरयाणासह एकूण नऊ राज्यांमधील प्रमुख वेश्या वस्त्यांमध्ये प्रथम विश्वासू खबऱ्यांचे जाळे तयार केले. त्या आधारे त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते.
Published on

मुंबई, ता. २९ : वडाळा येथे अल्पवयीन मुलाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी दिल्लीत जेरबंद केले आहे. तब्बल नऊ राज्यांमधील रेड लाईट वस्त्यांमध्ये खबऱ्यांमार्फत पाळत ठेवत निव्वळ मानवी कौशल्याआधारे समलैंगिक संबंधातून झालेल्या हत्येचा पोलिसांनी उलगडा केला.

पश्चिम बंगाल येथे पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप झालेल्या बिपुल सिकारी (३९) याची कोव्हिड काळात पॅरोलवर कारागृहातून सुटका झाली होती. वडाळ्यात नातेवाइकांकडे आश्रय घेतलेल्या बिपुलची पूर्वाश्रमी दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश येथील वेश्या वस्त्यांमध्ये दलाल म्हणून काम केलेल्या एका अल्पवयीन मुलासोबत मैत्री झाली. दोघांमध्ये समलैंगिक संबंध निर्माण झाले. २८ जानेवारी रोजी बिपुल या मुलाला शेजारील किन्नरांच्या वस्तीत घेऊन गेला होता. तेथून तो एकटाच वस्तीत परतला.

wadala murder case
Navi Mumbai Murder case: 'मित्रांना ठार करून अभयारण्यात फेकून दिलं..' नवी मुंबईतील दुहेरी हत्याकांडाची अखेर उकल

रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी आला नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरू केली. वस्तीतल्या काहींनी बिपुलसोबत मुलाला जाताना पाहिले होते. संशयाच्या बळावर वस्तीतल्या नागरिकांनी त्याला पकडले, बेदम मारहाण केली आणि वडाळा टी टी पोलिस ठाण्यात आणले, मात्र त्याने आश्चर्यकारकरीत्या वडाळा पोलिस ठाण्यातून पळ काढला होता.

दरम्यान, दोन महिन्यांनी मार्चमध्ये परिसरातील खाडीत शीर नसलेला बेवारस, पूर्णपणे कुजलेला मृतदेह सापडला होता. मृतदेहावरील वस्त्रे आणि डीएनए चाचणीतून हा मृतदेह अल्पवयीन मुलाचाच असल्याचे स्पष्ट झाले होते. शोधाशोध केल्यावर दोन दिवसांनी काही अंतरावरच मानवी कवटी सापडली. त्याचाही डीएनए नमुना जुळला. त्यामुळे पोलिसांचा बिपुलवरील संशय आणखी बळावला होता.

हत्येचे कारण

बिपुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २८ जानेवारीला किन्नरांच्या वस्तीतून घरी परतण्यापूर्वी शरीरसंबंध झाले होते. घरी परतण्यास उशीर झाला होता. घरी आईने जाब विचारला तर सर्व खरे सांगेन, असे अल्पवयीन मुलगा म्हणाला. त्यामुळे अटकेच्या भीतीने मुलाची हत्या केली होती.

निव्वळ मानवी कौशल्य

बिपुल मोबाईल वापरत नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संपूर्ण तपास मानवी कौशल्यावर अवलंबून होता. त्याची पार्श्वभूमी लक्षात घेता उपायुक्त कदम, वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकांनी दिल्ली, प. बंगाल, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब-हरयाणासह एकूण नऊ राज्यांमधील प्रमुख वेश्या वस्त्यांमध्ये प्रथम विश्वासू खबऱ्यांचे जाळे तयार केले. त्या आधारे त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात होते.

२१ ऑगस्टला जी. बी. रोडवर आला आणि...


वडाळा टी. टी. पोलिस ठाण्यातून पसार झालेला बिपुल सायन कल्याण मार्गे पुण्याला गेला. तेथून त्याने दिल्ली गाठली. पुढील काही दिवस जम्मू काश्मीर भागात लपल्यानंतर २१ ऑगस्टला उत्तर प्रदेशहून दिल्लीच्या जी. बी. रोडवरील वेश्या वस्तीत आला. या वेळी मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या खबऱ्याला भेटला. खबऱ्याने उपायुक्त कदम, वरिष्ठ निरीक्षक चव्हाण यांना तशी खबर दिली. त्यानंतर दारू पाजून दिल्लीच्या कमला मार्केट पोलिस ठाण्यात नेले. कदम यांनी दिल्ली पोलिसांना बिपुलच्या गुन्ह्याबाबत इत्थंभूत माहिती दिली होती.

आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. या सात महिन्यांत आरोपीने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे. शिवाय या गुन्ह्यात पोक्सोनुसार कलमे वाढवणार आहोत. या प्रकरणाचा खटला शीघ्रगतीने चालावा, विशेष सरकारी वकील उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- प्रशांत कदम, पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...