मुंबई
Mumbai Traffic : मुंबई-ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; ‘MMRDA’ची कंत्राटदार नियुक्तीस मंजुरी
पायाभूत सुविधा प्रकल्प मुंबई आणि ठाण्यातील वाहतुकीची स्थिती सुधारण्यात आणि विकासाच्या प्रक्रियेला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले.
मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार आहे. येथील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून ती फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीने तब्बल १२ हजार ५४४ कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटदारांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे.