Mumbai: मरीन ड्राईव्हवर सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लान करताय? IND vs NZ कसोटीमुळे वाहतूक मार्गात झालेत बदल, एकदा वाचा

Mumbai: मरीन ड्राईव्हवर सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लान करताय? IND vs NZ कसोटीमुळे वाहतूक मार्गात झालेत बदल, एकदा वाचा

Wankhede Stadium: भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील क्रिकेट सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होऊ शकते.
Published on

Latest Mumbai News: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघामध्ये वानखेडे स्टेडिअम १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान कसोटी क्रिकेट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह परिसरात वाहतूक मार्गात अंशतः बदल करण्यात आला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील क्रिकेट सामने पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची आणि वाहनांची गर्दी होऊ शकते.

त्यामुळे होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १ ते ५ नोव्हेंबरदरम्यान सकाळी सातपासून ते रात्री आठपर्यंत अंशतः बदल करण्यात आला आहे. तसेच, वानखेडे स्टेडिअम येथे पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा (विशेषतः लोकलचा) वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच, निर्बंध असलेल्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

Mumbai: मरीन ड्राईव्हवर सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लान करताय? IND vs NZ कसोटीमुळे वाहतूक मार्गात झालेत बदल, एकदा वाचा
Mumbai News: दिवाळीची धामधूम सुरू असतानाच इंस्टावर पोस्ट करत तरुणाने संपवले जीवन, रिल्समध्ये शिवसेना नेत्याच्या भावाचा उल्लेख

पार्किंग निर्बंध

‘सी’ रोडवर उत्तर बाजू एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ रोडच्या जंक्शनपर्यंत.
‘डी’ रोडवर एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ रोडच्या जंक्शनपर्यंत.
‘ई’ रोडवर ‘डी’ रोडच्या जंक्शनपासून ‘सी’ रोडपर्यंत.
‘एफ’ रोडवर एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ क्रॉस रोड जंक्शनपर्यंत.
‘जी’ रोडवर दक्षिण बाजू एन. एस. रोडच्या जंक्शनपासून ‘ई’ क्रॉस रोडच्या जंक्शनपर्यंत.
‘ई’ क्रॉस रोडवर ‘एफ’ रोड जंक्शनपासून ‘जी’ रोडच्या जंक्शनपर्यंत.
एन. एस. रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) मफतलाल बाथ सिग्नल ते एअर इंडिया जंक्शनपर्यंत.
वीर नरिमन रोडवर (दक्षिण व उत्तर वाहिनी) चर्चगेट जंक्शन ते सुंदरमहल जंक्शनपर्यंत.

Mumbai: मरीन ड्राईव्हवर सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लान करताय? IND vs NZ कसोटीमुळे वाहतूक मार्गात झालेत बदल, एकदा वाचा
Mumbai Fire: अंधेरीत लागलेल्या आगीत दहा दुकाने जळून खाक

वाहतुकीच्या मार्गातील बदल-

‘डी’ रोड हा एन. एस. रोडवरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (पश्चिम-पूर्व) मार्ग राहील.
‘ई’ रोड हा एन. एस. रोडवरील (मरीन ड्राईव्ह) जंक्शन ते ‘ई’ व ‘सी’ रोड जंक्शनपर्यंत एक दिशा (दक्षिण वाहिनी) मार्ग राहील.

Mumbai: मरीन ड्राईव्हवर सुट्टी एन्जॉय करण्याचा प्लान करताय? IND vs NZ कसोटीमुळे वाहतूक मार्गात झालेत बदल, एकदा वाचा
Mumbai News: दिवाळीची धामधूम सुरू असतानाच इंस्टावर पोस्ट करत तरुणाने संपवले जीवन, रिल्समध्ये शिवसेना नेत्याच्या भावाचा उल्लेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.