एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

एसटी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
Published on

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ३ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सहा हजारांचा बोनस आणि १२,५०० आगाऊ रक्कम मिळाली नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे निवडणूक काळात आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळी भेट म्हणून काही रक्कम देण्यात येते. यंदाही महामंडळाने कर्मचारी, अधिकाऱ्यांना सरसकट सहा हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी १५ ऑक्टोबर रोजी महामंडळाच्या अध्यक्षांकडे प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देताना शासनाकडे ५२ कोटींच्या निधीसाठीचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने पाठवला होता; मात्र आचारसंहितेचे कारण देत त्यावर निर्णय झाला नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे.
------------------------------------------
राज्यातील इतर अनेक आस्थापनांतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी भाऊबीज आनंदात साजरी केली; पण अत्यावश्यक सेवा असल्याने एसटी कर्मचारी दिवाळीच्या सुटीतही कामावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने दैनंदिन प्रवासी उत्पन्नातून आवश्यक रक्कम तातडीने द्यावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
-------------------------
एसटी कामगारांना दरवर्षीप्रमाणे यंदा दिवाळी भेट, उचल मिळाली नसल्याने कर्मचारी नाराज आहेत. संघटनेच्या वतीने महामंडळाच्या अध्यक्षांशी अनेक वेळा संपर्क केला आहे. तसेच, शासनाचे वित्त विभागाच्या अपर सचिवांना प्रत्यक्ष भेटून पत्र देऊन विनंती केली आहे. त्यामुळे किमान आजतरी निर्णय घ्यावा, अन्यथा त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना
--------------------------
राज्यात दिवाळीचा  सण उत्साहात साजरा होत आहे;  पण एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी अंधार आहे. त्यांना बोनस आणि उचल मिळाली नाही. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. त्यामुळे कर्मचारी मतदानावर बहिष्कार टाकतील  किंवा निवडणूक काळात मदत करणार नाहीत. 
- विजय कोळी, सचिव, मुंबई विभाग, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()