बालिकेच्या उपचाराच्या नावे साडेचार कोटींचा घोटाळा
बालिकेच्या उपचाराच्या नावे साडेचार कोटींचा घोटाळा
अभिनेत्री सना खानने केले होते मदतीचे आवाहन
मुंबई, ता. २७ ः बालिकेला गंभीर आजार असून उपचारांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे भासवून सेलिब्रिटींकरवी मदतीची मोहीम उघडून तब्बल साडेचार कोटींचा घोटाळा करणाऱ्या आरोपींविरोधात सोमवारी माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
हे प्रकरण न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद झाले असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी इम्पॅक्ट गुरू ॲपचे संचालक पियूष जैन, निखत खान, नौफिल काझी यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींनी इनारा काझी ही चार वर्षांची बालिका स्पायनल मर्क्युलर ॲट्रॉफी या आजाराच्या उपचारांसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल असून १७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा बनाव रचण्यात आला. आरोपींनी अभिनेत्री सना खान हिला ही बाब पटवून दिली आणि मदतीसाठी आवाहन करण्याची विनंती केली. त्यानुसार आरोपींनी एक स्टोरी तयार करून ती सनाच्या इंस्टाग्राम खात्यावरून सर्वदूर पसरवली. अवघ्या काही दिवसांत सनाच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि साडेचार कोटी रुपये गोळा झाले. मात्र ही रक्कम बालिकेच्या उपचारासाठी न वापरता ती आरोपींनी वैयक्तिक कारणांसाठी वापरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता आरिफ अहमद शेख यांनी खासगी तक्रारीद्वारे न्यायालयात केला होता. त्यावर न्यायालयाने माटुंगा पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये या बालिकेच्या पालकांचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.