वसंतराव नाईक महाविद्यालय, मुरुड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

वसंतराव नाईक महाविद्यालय, मुरुड येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

Published on

योगामुळे शरीर निरोगी
मुरूड (बातमीदार)ः वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या वतीने आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. ए. नगरबावडी , उपप्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. मुनेश्वर, आदी प्राध्यापक-कर्मचारी उपस्थित होते. योगाचे आपल्‍या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, त्‍यामुळे शरीर निरोगी राहत असल्‍याचे प्रतिपादन योग प्रशिक्षक प्रकाश मसाल यांनी केले.
सोबत - फोटो
............
मुरूडमध्ये ओंकार विद्यामंदिरात प्रात्यक्षिके
मुरूड (बातमीदार) ः हिंदू एज्युकेशन सोसायटीसंचलित ओंकार विद्यामंदिर व भारतीय जनता पक्ष यांचे संयुक्त विद्यमाने योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, संघटक सरचिटणीस प्रवीण बैकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, शहर सरचिटणीस अभिजित पालवणकर व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते. प्रात्यक्षिके सादर केल्यानंतर विद्यार्थ्याला पेन वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.