Murud News: साळाव- मुरूड रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत खराब स्थितीत असल्याने वाहनचालकांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी निधीची तरतूद झाली आहे.
मात्र पहिल्या टप्प्यातील काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने ग्रामस्थांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या अलिबाग, मुरूडमध्ये पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पुणे, मुंबई, ठाणे येथून पर्यटक येत असतात. मात्र येथील अंतर्गत रस्त्यासह प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांसह ग्रामस्थांना त्रास सोसावा लागत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून साळाव-मुरूड रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करावी, यासाठी मुरूड तालुक्यातील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. याचा थेट फटका येथील पर्यटन व्यवसायावर होत आहे.
त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार निधीतून अर्थसंकल्पातून विशेष ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून रस्त्याचा पहिला टप्पा बोर्ली ते साळावचे काम सुरू ही झाले आहे.
परंतु हे काम अपेक्षित गतीने होत नसल्याने स्थानिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच विहूर ते माजगाव हा रस्ता खूपच खराब व खड्डेमय झाला आहे.
काशीद ते बोर्लीपर्यंत खराब रस्ता असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. शिवाय रस्ता लवकर होत नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे.
कमीत कमी आठ दिवसाच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
साळाव -मुरूड रस्त्यासाठी अडीच-अडीच किलोमीटरचे टप्पे तयार करण्यात आले असून त्याप्रमाणे हे काम पूर्ण होणार आहे.
लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.