अजित पवारांविरोधात नवी मुंबईत आंदोलन

अजित पवारांविरोधात नवी मुंबईत आंदोलन

Published on

तुर्भे, ता.३(बातमीदार): विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी नवी मुंबई भाजपच्यावतीने तुर्भे येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित आंदोलकांनी अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना माफी मागण्याची मागणी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. नवी मुंबई भाजपच्या वतीने याबाबत तुर्भेत आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी अजित पवार यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीने धर्मवीर संभाजी राजे यांच्याबद्दल अविवेकी वक्तव्य करणे अशोभनीय असल्याचे नमूद केले. तर आंदोलकांनी अजित पवार यांनी तत्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. या आंदोलनात माजी नगरसेविका विजया घरत, विकास सोरटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.