गुटखा वाहतूक; दोघांना अटक

गुटखा वाहतूक; दोघांना अटक

Published on

मनोर/ बोईसर, ता. ५ (बातमीदार) : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूचा साठा बेकायदा बोईसर शहरात आणण्यात येणार असल्याची माहिती बोईसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी रात्री सापळा रचला होता. बोईसर एमआयडीसीमधील मुकुट टॅंक कंपनीजवळ संशयिताची इनोव्हा कार थांबवून तपासणी केली असता कारमध्ये विमल गुटख्याच्या १६ गोणी आढळून आल्या. कारवाईत सहा लाख ९६ हजार रुपये किमतीचा गुटखा आणि तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुटख्याची तस्करी करणारे फुजेल मोहम्मद खालीद शेख (रा. चित्रालय- बोईसर) आणि गाडीचा चालक पवन पाटील (रा. वालीव- वसई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच कारवाईदरम्यान बारा लाख ७४ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.