प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरएमसी प्रकल्पधारकांत हितसंबंध
भाईंदर, ता.१४ (बातमीदार) : रेडीमिक्स सिमेंट काँक्रीट प्रकल्पांमुळे (आरएमसी प्रकल्प) होत असलेल्या प्रदूषणाविरोधात विधिमंडळात आवाज उठवल्यानंतरही ठाणे जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरएमसी प्रकल्पधारक यांच्यात असलेल्या हितसंबंधांमुळे या प्रकल्पांवर कारवाई झालेली नाही, असा खळबळजनक आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या प्रकल्पांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व हे प्रकल्प महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर किमान वीस किमी अंतरापर्यंत स्थलांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मिरा-भाईंदर शहरात काशी मिरा तसेच घोडबंदर गावानजिक मोठ्या प्रमाणात आरएमसी प्रकल्प आहेत. रहिवासी क्षेत्रालगतच असलेल्या या प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे आसपासचे रहिवासी त्रस्त झाले असून त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यासंदर्भात ‘सकाळ’ने सविस्तर वृत्त याआधी प्रसिद्ध केले होते. आता आरएमसी प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
घोडबंदर गावाजवळील आरएमसी प्रकल्प तसेच ठाण्याच्या हद्दीतील नागला बंदर येथे असलेले खडीक्रशर यामुळे होत असलेल्या प्रदूषणाविरोधात डिसेंबर २०२१ मध्ये विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यानंतर प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पांविरोधात कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागाकडून संबंधितांना देण्यात आले होते. पण ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळ व आरएमसी प्रकल्प धारक यांच्यातील हितसंबंधांमुळे आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. शहरी भागात होत असलेल्या विकासकामांमुळे या प्रकल्पांची आवश्यकता असली तरी नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन प्रकल्पांना परवानगी देताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून काही अटी घालणे आवश्यक आहे. परंतू अधिकार्यांकडून होत असलेल्या दूर्लक्षामुळे भरवस्तीत आरएमसी प्रकल्प उभारले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे असे सरनाईक यांचे म्हणणे आहे.
...
‘प्रकल्प स्थलांतर करण्याचे आदेश द्या’
मिरा भाईंदर व ठाणे परिसरातील भरवस्तीत आरएमसी प्रकल्पांना परवानगी देणाऱ्या अधिकऱ्यांवर कारवाई करावी. तसेच लोकवस्तीलगत सुरू असलेले आरएमसी प्रकल्प महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर किमान वीस किलोमीटर दूरपर्यंत स्थलांतर करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.