आपला दवाखान्यात आता डोळ्यांचीही तपासणी

आपला दवाखान्यात आता डोळ्यांचीही तपासणी

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रात अर्थात आपला दवाखान्याला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील दोन महिन्यांत ५० दवाखान्यांत नेत्र तपासणीची सुविधा सुरू केली जाणार आहे. यासाठी ओपीडी विभाग सुरू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत १०६ दवाखाने सुरू असून मार्च अखेरपर्यंत आणखी २०० दवाखाने सुरू केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ नोव्हेंबर २०२२ रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मागील साडेचार महिन्यांत आपला दवाखान्यांत तीन लाख नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला होता. यापैकी दवाखान्यांमधून दोन लाख ८८ हजार रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला आहे. पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्र येथे १३,०५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोगतज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले.

अत्याधुनिक उपकरणे खरेदी करणार
आपला दवाखान्यातील ऑप्थॉल्मिक ओपीडीसाठी आवश्यक त्या उपकरणांची खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी मोबिलिटी ग्लोबल आयएनसी या कंपनीची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.