बोईसर रेल्वे स्थानक परिसरात कायम वाहतूक कोंडी,

बोईसर रेल्वे स्थानक परिसरात कायम वाहतूक कोंडी,

Published on

बोईसर परिसरात वाहतुकीचे नियमन गरजेचे
नावीद शेख, मनोर
बोईसर शहर आणि रेल्वे स्थानक परिसरात सुमारे दीड हजार प्रवासी रिक्षा धावत आहेत. मुंबई, वसई, विरार आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून बोईसर आणि तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक रिक्षांमधून होत असते. व्यवसाय आणि प्रवासी बसवण्याच्या स्पर्धेत रस्त्यालगत रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने बोईसर रेल्वे स्थानक, नवापूर नाका आणि एसटी डेपो भागात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. चाकरमानी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी वाहतूक विभागाकडून रेल्वे स्थानक, नवापूर नाका आणि एसटी डेपो भागात वाहतूक नियमन करण्याची मागणी केली जात आहे. तीनपेक्षा अधिकच्या संख्येने प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. परवाना नसलेले चालक, वैध कागदपत्रांशिवाय आणि ज्यादा प्रवासी वाहतूक प्रकरणी नव्याने निर्माण झालेल्या वाहतूक शाखेकडून आठ ते दहा प्रवासी रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. बोईसरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर दररोज कारवाई केली जात असल्याची माहिती बोईसर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप भोपळे यांनी दिली.
------------
मनोरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक संख्येने वाहतूक
मनोर शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे पाचशे तीन आसनी रिक्षा धावत आहेत. मनोरच्या ग्रामीण भागातून खरेदीसाठी मनोर बाजारपेठेत येणारे ग्रामस्थ आणि प्रवासी तीन आसनी रिक्षातून मोठ्या संख्येने प्रवास करतात. ग्रामपंचायत कार्यालय, एसटी स्टॅंड लगतच्या रिक्षा स्टॅण्डवर ३५०, मनोर बाजारपेठेत १२० आणि वेळगाव रस्त्यावरील स्टॅण्डवर २५ रिक्षा अशा पाचशे तीन आसनी रिक्षा आहेत. एसटी स्टॅन्ड जवळच्या रिक्षा स्टॅण्ड परिसरात वाहतूक कोंडी होत असते. स्टॅण्डवर लावलेल्या रिक्षा आणि रांगेतून क्रमांक आल्यानंतर प्रवासी बसवण्यासाठी रिक्षाचालकांची धडपड आणि प्रवाशांच्या गर्दीमुळे स्टँड परिसरात वाहतूक कोंडी होते. ग्रामीण भागातून आणि लांबच्या अंतरावरून प्रवासी वाहतूक केली जात असल्याने क्षमतेपेक्षा अधिकच्या संख्येने प्रवासी वाहतूक केली जाते. वाहतूक शाखेच्या दोन कर्मचाऱ्यांची मनोरमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------------------------------------
पालघर शहरात रिक्षा परवान्यांची डोकेदुखी
प्रकाश पाटील, पालघर
सरकारकडून परवाने वाटप केले जात असल्याने पालघर शहरात रिक्षांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रवासी कमी व रिक्षा व्यावसायिक जास्त असल्याने रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. शहरात काही प्रमाणात अनधिकृत रिक्षा देखील आहेत त्यामुळे कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. परवाने वाटप केल्याने रिक्षा व्यवसायाकडे नागरिक वळू लागले आहेत. पालघर शहरात वाहतूक कोंडी होत असते. रिक्षातळच नसल्‍याने जादा क्षमतेने प्रवासी वाहतूक देखील होत असते. सहा आसनी रिक्षेत १४ ते १५ प्रवासी बसवले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()