Water Shortage
Water Shortagesakal

Thane Water Shortage : ठाणेकरांचा एप्रिल फूल पाणी टंचाईने

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी ठाणेकरांना संपूर्ण एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
Published on
Summary

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी ठाणेकरांना संपूर्ण एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

ठाणे - धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी ठाणेकरांना संपूर्ण एप्रिल महिन्यात पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाण्यात गळती निर्माण झाली असून त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार (ता. ३१) पासून हाती घेण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या जुने ठाणे परिसरातही कपात लागू राहणार असल्याने त्याचा फटका रहिवाशांनाही बसणार आहे.

ठाणे शहराला स्वत:च्या योजनेतून २५० एमएलडी, स्टेमकडून ११५ एमएलडी, एमआयडीसीकडून १३५ एमएलडी आणि मुंबई पालिकेकडून १८५ एमएलडी असा पाणीपुरवठा होतो. सध्या धरणांमध्ये पाण्याची स्थिती समाधानकारक असल्याने उन्हाळ्यात अद्याप पाणीकपातीचे संकेत नव्हते; पण त्यात आता मुंबई महापालिकेच्या जलबोगद्याला लागलेल्या गळतीचा खडा पडला आहे.

ठाणेकरांच्या हक्कावर ‘पाणी’

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला ठाणे किसननगरमध्ये कूपनलिकेच्या खोदकामामुळे भगदाड पडले आहे. त्यातून रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. गेले पाच महिने गळती सुरू असतानाही तिच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेल्याने पाणी नाल्यात जात आहे. त्यासंबंधीचे वृत्त सातत्याने प्रसिद्ध झाल्यानंतर आता संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले आहे; पण तोपर्यंत मुंबई आणि पर्यायाने ठाणेकरांच्या हक्काच्या लाखो एमएलडी पाण्यावर संकट आले आहे.

पाण्‍याचा योग्य वापर करण्‍याचे आवाहन

पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्यानंतर आता ३१ मार्चपासून जलबोगद्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ते साधारण महिनाभर चालणार आहे. दरम्यान मुंबई आणि ठाणे शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ठाण्यात त्याची सर्वाधिक झळ जुने ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‍कोपरी, नौपाडा, हाजुरी, टेकडी बंगला, लुईसवाडीपासून ते रघुनाथनगर, बाळकूम परिसराला लागणार आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती असून, ३० एप्रिलपर्यंत त्यांना १५ टक्के पाणीकपात सहन करावी लागणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Water Shortage
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार! मुंबई हायकोर्टानं फेटाळली याचिका

कोणत्या परिसराला बसणार झळ

१ गावदेवी जलकुंभावरून पाणीपुरवठा होणारा परिसर - नौपाडा, गोखले रोड, स्थानक परिसर, बी केबिन, राम मारुती मार्ग उजवी बाजू, महागिरी, खारकर आळी, चेंदणी, खारटन रोड आणि मार्केट परिसर.

२ टेकडी बंगला जलकुंभावरून पाणीपुरवठा होणारा परिसर - टेकडी बंगला, वीर सावरकर पथ, संत गजानन महाराज मंदिरपर्यंत, पाचपाखाडी, नामदेववाडी, भक्ती मंदिर रस्ता आणि सर्व्हिस रस्ता.

३ कोपरी कन्हैयानगर व धोबीघाट जलकुंभावरून पाणीपुरवठा होणारा परिसर - कोपरी गाव, ठाणेकरवाडी, सिंधी कॉलनी, साईनाथनगर, साईनगर, कोळीवाडा, सिडको संपूर्ण कोपरी (पूर्व), आनंदनगर, गांधीनगर, कान्हेवाडी, केदारेश्वर आणि संपूर्ण ठाणे पूर्व परिसर.

४ हाजुरी कनेक्शनमार्फत थेट पाणीपुरवठा - लुईसवाडी, काजूवाडी, हाजुरी गाव, रघुनाथनगर, जिजामाता नगर व साईनाथ नगर.

५ किसननगर कनेक्शनमार्फत थेट पाणीपुरवठा - किसननगर १, किसननगर २, किसननगर ३, शिवाजीनगर, पडवळनगर व डिसोझावाडी.

६. अंबिकानगर कनेक्शनमार्फत थेट पाणीपुरवठा - अंबिकानगर २, ज्ञानेश्वरनगर, जयभवानी नगर व राजीव गांधी नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.