तृतीयपंथी समाजाचा अविभाज्य घटक

तृतीयपंथी समाजाचा अविभाज्य घटक
Published on

कासा/डहाणू, ता. २ (बातमीदार) : तृतीयपंथी समाज आपल्याच समाजाचा अविभाज्य घटक असल्याने त्यांच्याबद्दल दुराग्रह करू नये, त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सर्वांनी पोषक वातावरण निर्माण करायला हवे. ट्रान्सजेंडर समाजाच्या विविध समस्या शासन स्तरावर सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. शासनदेखील या समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवून तृतीयपंथींचे सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी संजिता महापात्र यांनी केले.
डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित के. एल. पोंदा हायस्कूल डहाणू येथे आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी दिन साजरा करण्यात आला. या वेळी सहायक जिल्हाधिकारी संजिता महापात्र बोलत होत्या. या सोहळ्यात परिसरातील तृतीयपंथींचा सन्मान करण्यात आला. या वेळी तहसीलदार रोहन कुवर, संस्थेचे मानद सचिव सुधीर कामत, मुख्याध्यापक रवींद्र बागेसर, पर्यवेक्षक सुनील मोरे, तृतीयपंथी समाजाच्या डहाणूस्थित मुख्य गुरु रेश्मा पवई, सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला डामसे, तृतीयपंथी आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. शाळेच्या सहशिक्षिका मनीषा गोसावी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक बाळासाहेब चव्हाण यांनी केले. वंदना चौधरी यांनी आभार मानले.

---------------------
सर्वांना समानतेचा हक्क
मुख्याध्यापक रवींद्र बागे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तहसीलदार रोहन कुवर यांनी तृतीयपंथींच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. सुधीर कामत यांनी अध्यक्षीय भाषणात या समाजाच्या वास्तवतेवर भाष्य करताना मानवतेला अनुसरून तृतीयपंथींना कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर ठेवता कामा नये, या समाजाप्रती पूर्वग्रह न बाळगता राज्यघटनेने त्यांनाही सन्मानाने जीवन जगण्याचा हक्क, समानतेचा हक्क दिला आहे. त्यामुळे त्यांना सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या वेळी तृतीयपंथी भावना मंगलमुखी व उपगुरू पलक पवई यांनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.