जिल्हा कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव सेवानिवृत्त

जिल्हा कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव सेवानिवृत्त

Published on

मनोर, ता. १० (बातमीदार) : पालघर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव नुकतेच सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम नुकताच वसई तालुक्यातील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावरील वैती रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सेवापूर्ती कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक उपस्थित होते. या वेळी सर्वांनी नरेंद्र आघाव यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. नरेंद्र आघाव यांची कृषी विभागात प्रथम नियुक्ती कृषी सहायक म्हणून झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून उपविभागीय कृषी अधिकारी पदापर्यंत त्यांनी मजल गाठली. त्यांच्या सेवेचा सर्वाधिक काळ कोकणात गेला आहे. आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून नाशिक येथे काम करीत असताना सेंट्रल किचनची संकल्पना राबवली. आज राज्यातील सर्व आश्रमशाळांसाठी सेंट्रल किचन राबवले जाते. याचे सर्व श्रेय आघाव यांना जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com