प्रसाद चिकित्सा संस्थेला फाइव स्टार नामांकन

प्रसाद चिकित्सा संस्थेला फाइव स्टार नामांकन
Published on

वज्रेश्वरी, ता. १ (बातमीदार) : एचआयव्ही बाधितावरील उपचारासह त्यांच्यात मानसिक उभारी निर्माण करण्यासाठी गणेशपुरी येथील प्रसाद चिकित्सा संस्था कार्य करत आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीत प्रसाद चिकित्सा या संस्थेला फाईव्ह स्टार नामांकन प्राप्त झाले आहे. गणेशपुरी आणि तानसा खोऱ्यातील रुग्णांवर गेली १८ वर्षांपासून प्रसाद चिकित्सा संस्था उपचार करत आहे. या कामासाठी संस्थेमध्ये आयसीटीसी सेंटर चालविले जाते. यामध्ये एकूण १७४९ एचआयव्ही बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये औषधोपचार, पोषण आणि मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन केले जाते. तसेच एचआयव्ही बाधित रुग्णाच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते, जेणेकरून मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील आणि त्यांची शैक्षणिक प्रगती साधता येईल. आता या संस्थेला फाईव्ह स्टार नामांकन मिळाल्याने संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.