Jitendra Awhad said They beat Roshni Shinde to prevent her from becoming a mother
Jitendra Awhad said They beat Roshni Shinde to prevent her from becoming a mother esakal

Mumbai : राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक शिवसेनेत

गेल्या काही दिवसांपासून विटाव्यातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना, सभांना उपस्थित राहत नव्हते. तसेच कामातही सक्रिय नव्हते.
Published on

कळवा - विटाव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यांच्यासोबत विकसक संतोष तोडकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. जितेंद्र पाटील हे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय समजले जातात.

Jitendra Awhad said They beat Roshni Shinde to prevent her from becoming a mother
Sharad Pawar: शरद पवारांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बारामतीकरांना धक्का

गेल्या काही दिवसांपासून विटाव्यातील माजी नगरसेवक जितेंद्र पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा होती. ते राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना, सभांना उपस्थित राहत नव्हते. तसेच कामातही सक्रिय नव्हते. जितेंद्र आव्हाड यांच्यावरही ते नाराज असल्याचे बोलले जात होते. सोमवारी त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला.

त्यांच्यासोबत विकसक संतोष तोडकर यांनाही शिवसेनेत प्रवेश केला. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी १ मेला खारेगाव परिसरातील ९० फीट रस्त्यावर अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा’ हा प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी हजारो नागरिकांनी येथे गर्दी केली होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी हजेरी लावली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()