मलेरिया, डेंगीचा मुंबईला धोका

मलेरिया, डेंगीचा मुंबईला धोका

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः पावसाळा तोंडावर आल्याने मुंबईला डेंगीचा धोका वाढण्याची शक्यता असून रोग नियंत्रणासाठी डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची मोहीम सुरू आहे. पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने मुंबईत गेल्या तीन महिन्यांत मलेरिया आणि डेंगी नियंत्रणासाठी मोठी मोहीम राबवली. या तपासणीत डेंगी पसरवणाऱ्या एडिस डासांची एकूण १६ हजार ३३२ उत्पत्तीस्थाने आढळून आली, अशी माहिती पालिकेने दिली.
मुंबईतील पालिकेच्या २४ वॉर्डांत जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत डास निर्मूलन मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण उत्पत्ती स्थानांपैकी एक हजार ३२९ ठिकाणी मलेरिया पसरवणाऱ्या अॅनोफिलिस डासांच्या अळ्या आढळल्या, तर डेंगी नियंत्रणाच्या कारवाईत पालिकेने पाण्याची पिंपे, टायर, अडगळीच्या वस्तू, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट या ठिकाणी तपासणी केली. त्या ठिकाणी डेंगी पसरवणाऱ्या एडिस डासांच्या अळ्या एकूण १५ हजार ठिकाणी आढळल्या. म्हणजे एकूण १६,३३२ उत्पत्तीस्थाने पालिकेला आढळली. ही उत्पत्ती स्थाने पालिकडून नष्ट करण्यात आली. पालिकेने छपरावरून तसेच विविध आवारांतून टायर्स, अडगळीच्या वस्तू नष्ट केल्या. या तीन महिन्याच्या मोहिमेदरम्यान पालिकेने केलेल्या कारवाईत २,८४० जणांना नोटिसा बजावल्या, ६७ प्रकरणांत पालिकेने न्यायालयात दावे दाखल केले आहेत, तर दोन लाख २५ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात करण्यात आला असल्याचे पालिकेने सांगितले.
..
पालिकेचे आवाहन
टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांची झाकणे, पाण्याचे पिंप, मनी प्लांट, बांबू यांसारख्या शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी, कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचते व या पाण्यातही डास अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या निरुपयोगी वस्तू त्वरित नष्ट कराव्यात, असे आवाहन कीटक नियंत्रण विभागाने केले आहे.
...
मोहिमेची कामगिरी
डासांची उत्पत्ती स्थाने - १६,३३२
नोटीस बजावल्या - २,८४०
दंड वसूल - २,२५,७००
न्यायालयात प्रकरणे - ६७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()