गुजरातच्या ‘केसर’चा वाशीत दबदबा

गुजरातच्या ‘केसर’चा वाशीत दबदबा

Published on

तुर्भे, बातमीदार
मे महिना सुरू झाला असल्याने बाजारात राज्यासह परराज्यातील आंब्याची आवक वाढली आहे. त्यामुळे कोकणातील हापूसबरोबरच बाजारात दक्षिण भारतातील आंबेदेखील दाखल झाले आहेत. अशातच दर वर्षीप्रमाणे मे महिन्यात गुजरातहून वाशीत दाखल होणाऱ्या केसरचा सुगंध दरवळू लागल्याने ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
--------------------------------------------
महाराष्ट्रात हापूस आंब्याला जो मान आहे, तोच गुजरातमध्ये केसर आंब्याला आहे. त्यामुळे गुजराती, मारवाडी लोक हा आंबा आवर्जून खातात. आत्ता केसरचा हंगाम सुरू झाला असून बाजारात त्याची चांगली आवक सुरू झाली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपासून बाजारात गुजरातमधून लांबड्या केसर आंब्याची आवक बाजारात सुरू होते. या आंब्याचा जून जुलैपर्यंत हंगाम सुरू असल्याने त्याची आवक वाढली आहे. अशातच पाऊस पडायला सुरुवात झाली की हापूसची मागणी कमी होते. त्यामुळे या काळात गुजरातच्या केसरला अधिक मागणी वाढते. गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम या ठिकाणाहून सध्या मोठ्या प्रमाणात केसरचा आंबा वाशीच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. सध्या पाच ते सहा हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या असून घाऊक बाजारात केसरची ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही १०० ते १२० रुपये किलोने केसर आंबा मिळत आहे.
---------------------------------------------------
आंब्याच्या निर्यातीला सुरुवात
केसर दिसायला पिवळाधमक आणि आकाराने थोडासा लांबट आणि टोकदार असतो. हा आंबा चवीलाही गोड असतो. हापूसनंतर आंब्यामध्ये केसर आंब्याला अधिक मागणी असते. त्यातही गुजराती लोकांकडून या आंब्याला मोठी मागणी असते. काही प्रमाणात हा आंबा निर्यातही केला जातो. जसजशी आवक वाढेल, तशी या आंब्याच्या निर्यातीला सुरुवात होते. अशातच या वर्षी या आंब्याचे उत्पादन चांगले झाल्याचे चित्र आहे.
-------------------------------------------------------
यंदा केसर आंबा लवकर बाजारात दाखल झाला आहे. त्यात हापूस आंब्यांची यंदा आवक कमी असल्याने केसरला चांगला उठाव मिळत आहे आठवड्याभरात ही आवक आणखी वाढणार असल्याने दर अजून खाली येतील.
- शिवाजीराव चव्हाण, व्यापारी, वाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.