be careful due to climate change fever cough patients increased
be careful due to climate change fever cough patients increasedSakal

Weather Update : काळजी घ्या! वातावरण बदलामुळे आजार वाढले

अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर चार-पाच दिवसांपासून काही वेळ ढगाळ, तर जास्त वेळ ऊन पडत आहे.
Published on

वाडा : अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर चार-पाच दिवसांपासून काही वेळ ढगाळ, तर जास्त वेळ ऊन पडत आहे. त्यामुळे विविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वातावरण बदलामुळे तालुक्यातील खासगी डॉक्टरांकडे ताप, डोके दुखणे, चक्कर येणे यांवर उपचार घेण्यासाठी रुग्णांची रांग लागत असल्याचे दिसत आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाडा तालुक्यातील उन्हाचा पारा अधिकच वाढला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत आहे. तालुक्यातील कुडूस ही ५२ गाव-खेड्यांची बाजारपेठ असल्यामुळे अनेक गावांतील नागरिक खरेदी-विक्रीच्या निमित्ताने कुडूसला येत आहेत; परंतु उन्हाचा पारा अधिक वाढल्यामुळे सद्यःस्थितीत दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवतो. पाच वाजल्यानंतर मात्र बाजारपेठेत वर्दळ दिसून येत आहे.

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. अशा वेळी बच्चेकंपनी बाहेर जाण्याचा आणि उघड्यावरील पदार्थ खाण्याचा हट्ट धरू लागतात. बहुतांश वेळेला उन्हात खेळू लागतात, अशावेळी पालकांनी लहान मुलांची काळजी घेत दुपारच्या उन्हात बाहेर जाऊ देऊ नये. उकळलेले पाणी शक्यतो मुलांना द्यावे.
- डॉ. जयेश पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.