सायबर गुन्हेगारांची गाडी सुसाट..!
सायबर गुन्हेगारांची गाडी सुसाट..!sakal

Mumbai Cyber Crime : सायबर चोराकडून एकाची फसवणूक

एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ९९ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
Published on

नवी मुंबई - वीज देयक भरले नसल्याची थाप मारून एका सायबर चोराने खारघरमध्ये राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ लाख ९९ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे.

 सायबर गुन्हेगारांची गाडी सुसाट..!
Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु


खारघर सेक्टर- १० मध्ये राहणारे शंकर अय्यर (६२) यांना घरामध्ये बसले असताना एका सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून घराचे वीज देयक भरले नसल्याचे सांगितले. तसेच अय्यर यांनी भरलेले लाईट बिल सिस्टीममध्ये दिसत नसल्याचे सांगून अपडेट करण्यासाठी २० रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले.

 सायबर गुन्हेगारांची गाडी सुसाट..!
Mumbai : नाले सफाईत दिरंगाई झाल्यास कंत्राटदारावर कारवाई

त्यानंतर अय्यर यांच्याकडून अॅप्लिकेशनचा पिन नंबर मागून घेत मोबाईलमध्ये प्रवेश करून त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ४९ हजार रुपये, तर दुसऱ्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून घेतले. याबाबतची माहिती अय्यर यांना मिळाल्यानंतर त्यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.