Mumbai : मॉर्निंगवॉक करताना हेल्मेट घालून आले अन् ४० हजार रुपयांची सोन्याची चेन खेचून ठोकली धूम
नवी मुंबई - मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका महिलेसह ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना ऐरोलीत घडली आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.ऐरोली सेक्टर-९ मध्ये राहणाऱ्या निर्मला जयस्वाल (५०) परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या.
शुक्रवारी (ता. २६) सकाळी ६.३० वाजता नेहमीप्रमाणे घराबाहेर पडल्या असताना ऐरोली सेक्टर ७ व ८ मध्ये हेल्मेट घालून आलेल्या दुचाकीस्वाराने जयस्वाल यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले; तर या घटनेनंतर काही वेळातच ऐरोली सेक्टर-१६ भागात मॉर्निंग वॉक करणारे प्रकाश कांबळे (६०) यांच्या गळ्यातील सोन्याची चेनदेखील खेचण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांत रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.