Water Scarcity Crisis
Water Scarcity Crisissakal

Water Scarcity Crisis : भूगर्भपाणी पातळीत घट; पिण्याच्या पाण्यासह, शेतीसाठी पाणीटंचाई

वाढलेल्या भूजल पातळीचा किनारपट्टीलगतच्या भागातील नागरिकांना उपयोग होत नसल्याने येथील पाणीटंचाई अधिकच गंभीर
Published on

अलिबाग : भूगर्भातील पाणी पातळी खालावल्‍याने जिल्ह्याच्या किनारी भागात पाणी टंचाईचे संकट वाढत आहे. मुरूड, तळा तालुक्यातील पातळीत ०.१६ मीटर इतकी घट झाली आहे. अलिबाग, उरण, श्रीवर्धन या तालुक्यांमध्येही फारशी समाधानकारक स्थिती नाही.

यामुळे पिण्याच्या पाण्यासह, शेतीसाठी लागणाऱ्या पाणीटंचाई पुढील काळात अधिक गडद होणार असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीची स्थिती दर्शवण्यात आलेली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील ५२ नमुना विहिरींच्या पाणी पातळीचा अभ्यास केला, यात पाणीपातळी खालावली असल्याचे दिसून आले. यातील आठ विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर ४४ विहिरींमध्ये पातळी खालावत आहे.

भूगर्भातील पाणीसाठा वाढवण्यासाठी सरकारच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारे, यासारखे उपक्रम राबवले जातात; परंतु अद्याप सकारात्मक परिणाम दिसत नाही. अशीही काही गावे आहेत तिथे पाण्याची पातळी मागील पाच वर्षाच्या निच्चांकी सरासरीवर गेली आहे.

Water Scarcity Crisis
Alibaug Court : चोरट्याला ३० झाडे लावण्याची शिक्षा

यात तळा आणि मुरूड तालुक्यांमधील गावांचा समावेश आहे. तर किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये काही अंतरावर बोअरवेल्सना पाणी लागत असले तरी ते खारे असल्याने पाण्याची समस्या अधिकच गंभीर होत आहे.

वाढलेल्या भूजल पातळीचा किनारपट्टीलगतच्या भागातील नागरिकांना उपयोग होत नसल्याने येथील पाणीटंचाई अधिकच गंभीर होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Water Scarcity Crisis
Shahapur Water Crisis : शहापूरमधल्या कोथले येथील गावकर्यांचा पाण्यासाठी संघर्ष

त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजलपातळीच्या स्थितीवर होऊ लागला आहे. या वर्षी पर्जन्यमानासोबत तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यानुसार सरासरीच्या १५ तालुक्यांपैकी १२ तालुक्यांमध्ये ०.३१ मीटरपर्यंत पाणी पातळी वाढली आहे, तर सुधागडमध्ये १.२९ मीटर इतकी सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. तर अलिबाग तालुक्यातील बेलकडे, कर्जत तालुक्यातील आंबिवली, धामोटे, पेण तालुक्यातील उंबर्डे,महाड तालुक्यातील कोंझर, पोलादपूर शहर या ठिकाणी पाणीपातळीत सरासरीपेक्षा जास्त घट झाली आहे.

Water Scarcity Crisis
Water Supply : पावसाळ्यात वाढले पुणे जिल्ह्यातील टँकर्स; ५८ गावांना ४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा

खाऱ्या पाण्याचे वाढते प्रमाण
भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी ५२ निरीक्षण विहिरी निश्‍चित केल्या आहेत. गेल्या ऑक्टोबर अखेरमधील निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीचा मागील पाच वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सरासरी भूजलपातळीशी तुलनात्मक करण्यात आला.

बऱ्यापैकी पाऊस झाल्याने भूजलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र उपसा अधिक होत असल्याने किनारपट्टीवरील काही गावांमध्ये बोअरवेल्सना खारे पाणी लागण्याचेही प्रमाण वाढले आहे. जलजीवन मिशनअंतर्गत ज्या पाणवठ्यांवर पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या, त्या ठिकाणीही खारे पाणी लागले याचा सर्वाधिक परिणाम किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये दिसून येत आहे. यामुळे मुबलक पाणी असूनही त्याचा उपयोग पिण्यासाठी येथील नागरिकांना करता येत नाही.

भूजल पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यातील ५२ विहिरांची निवड करण्यात आली आहे. या विहिरांची सप्टेंबरमध्ये घेतलेल्या आकडेवारीनुसार रायगड जिल्ह्यात भूजल पातळी वाढलेली दिसून येत आहे. पावसाच्या प्रमाणावर अनेकवेळा ही पातळी अवलंबून असते.
- एच.एम. संगनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

Water Scarcity Crisis
Water Tanker : पावसाळ्यात वाढली पुणे जिल्ह्यात टँकरची संख्या; ५८ गावांना ४१ टँकरद्वारे पाणीपुरवठा

तालुकानिहाय भूगर्भीय पाणीपातळी
तालुका / पातळी(मीटर)

अलिबाग ०.२२
उरण ०.१७
पनवेल ०.२९
कर्जत ०.४७
खालापूर ०.५५
पेण ०.१४
सुधागड १.२९
रोहा ०.५३
माणगाव ०.२२
महाड ०.४८
पोलादपूर ०.४६
म्हसळा ०.१२
श्रीवर्धन ०.११
मुरूड (- ०.१९)
तळा (-०.१४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.