आईला शिवीगाळ करणार्‍या मुकादमची हत्या

आईला शिवीगाळ करणार्‍या मुकादमची हत्या

Published on

आईला शिवीगाळ करणाऱ्या
मुकादमाची हत्या करणाऱ्यास अटक

अंधेरी, ता. १४ (बातमीदार) ः आईला शिवीगाळ करणाऱ्या मुकादमाची कुऱ्हाडीने वार करून हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीस डी. एन. नगर पोलिसांनी आज अटक केली. अर्जुन किसन छोत्रे असे आरोपीचे नाव असून अंधेरीतील न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
मृत बाळू शिंदे अंधेरीतील चांदीवाला कम्पाऊंड परिसरातील पर्ल रिजन्सी इमारतीमध्ये राहत होता. त्याच इमारतीच्या तळमजल्यावर अर्जुन त्याच्या कुटुंबीयांसोबत राहतो. २ जून रोजी बाळूचा त्याची आई गंगुबाई छोत्रे यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याने त्यांना शिवीगाळही केली होती. त्या रागाच्या भरात अर्जुनने बाळूची कुऱ्हाडीने डोक्यावर आणि तोंडावर वार करून हत्या केली होती. हत्येनंतर तो पळून गेला होता. डी. एन. नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला. जळगाव रेल्वेस्थानक परिसरातून त्याला आज अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.