u turn traffic rule
u turn traffic rulesakal

Mumbai News : बंदी असतानाही वाहनांचा यू टर्न; पोलिसांचा सूचना फलक नावापुरताच

उड्डाणपुलाजवळच डावे वळण घेत यू टर्न मारून वाहने चोळेगाव दिशेने जातात.
Published on

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून येथून स. वा. जोशी शाळेजवळ यू टर्न मारून ठाकुर्ली दिशेला वाहन मार्गस्थ होतात; मात्र या यू टर्नवर तीन रस्त्यावरून वाहने येत असल्याने वाहने समारोसमोर आल्याने वाद होतात.

शिवाय अपघाताची शक्यतादेखील नाकारता येत नाही. हे वाद टाळण्यासाठी ठाकुर्ली उड्डाणपुलावरून जोशी शाळेजवळ डावे वळण घेणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक विभागाने प्रवेश बंद केला आहे. या मार्गावरील एक मार्गिका बंद करत त्या ठिकाणी प्रवेश बंदचा सूचना फलक लावला आहे. मात्र हा फलक केवळ नावाला उरला असून वाहने आज ही तो यू टर्न घेत प्रवास करत आहेत.

u turn traffic rule
Mumbai News : गोरेगावमध्ये गॅस गळतीमुळे आग; आगीत होरपळून एकाचा मृत्यू

डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून येणारी वाहने चोळेगावला जाण्यासाठी वल्लभभाई पटेल मार्गे बावनचाळ मार्गाचा वापर करण्याऐवजी स. वा. जोशी शाळेजवळील नेहरू रोडचा वापर करतात. उड्डाणपुलाजवळच डावे वळण घेत यू टर्न मारून वाहने चोळेगाव दिशेने जातात.

या यू टर्नच्या ठिकाणी उड्डाणपुलावरून येणारी वाहने, जोशी शाळेकडून येणारी वाहने आणि ठाकुर्ली दिशेकडून गणपती मंदिर अथवा बावनचाळ मार्गे जाणारी वाहने येऊन मिळतात. अरुंद असा हा मार्ग असल्याने वाहने समोरासमोर येऊन अनेकदा वाहनांची टक्कर होते. यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवतात.

u turn traffic rule
Mumbai : गजब कारभार! नगरपालिकेतील फाईल्सचा रुग्णवाहिकेतून प्रवास; अंबरनाथ नगरपालिकेतील प्रकार

मोठी वाहनेदेखील या मार्गाचा वापर करतात. ही वाहने टर्न घेताना या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. ही समस्या दै. सकाळने आपल्या वृत्ताच्या माध्यमातून सर्वात पहिले समोर आणली होती.

यानंतर वाहतूक विभागाने या ठिकाणी उपाययोजना करत डोंबिवली पश्चिमेतून ठाकुर्ली उड्डाणपुलावरुन येणारी व स. वा. जोशी शाळेमार्गे येऊन ठाकुर्ली चोळेगावमार्गे जाणारी वाहने ही उड्डाणपुलाजवळ यू टर्न मारत उड्डाणपूल खालील रस्त्याचा वापर करत चोळेगावमार्गे जात होती.

हा यू टर्नजवळील रस्ता अरुण असल्याने व तिन्ही मार्गे येणारी वाहने याचा वापर करत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व वाहनांची टक्कर होत होती.

वळण घेत असताना वाहने एकमेकांना घासत किंवा प्रसंगी ठोकर देत असल्याने वाहनचालकांमध्ये नियमित वादाचे प्रसंग होत होते. याविषयी दै. सकाळने एप्रिल महिन्यात वृत्त प्रसारित करत या समस्येला वाचा फोडली होती.

u turn traffic rule
Mumbai Local : महिला डब्यात पोलिसांची गस्त वाढवली! महिला सुरक्षेसंदर्भात लोहमार्ग पोलिस सक्रिय

वाहनचालकांचे दुर्लक्ष
शहर वाहतूक उपविभागाचे पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली त्यानंतर ठाकुर्लीकडे जाणाऱ्या चालकांना पुलाजवळील वळण मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ठाकुर्लीतून डोंबिवली पश्चिमेत, पश्चिम रेल्वे स्थानक, कानविंदे चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एकेरी मार्गिका उपलब्ध करून दिली आहे.

रस्त्यावर बॅरिकेड्स लावत एक मार्गिका बंद करण्यात आली आहे. बॅरिकेड्सवर वाहनांना प्रवेश बंदीचा फलकदेखील लावला आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाईचा इशारा वाहतूक विभागाने दिला होता. मात्र या सूचनेकडे तसेच कारवाईकडे वाहनचालक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.