Human Trafficking
Human Traffickingsakal

Thane Police Action : मानवी तस्करीविरोधात पोलिसांच्या धडक कारवाईत २३ गुन्हे दाखल,२५ दलालांना अटक; ४० पीडितांची सुटका

ठाण्यात निवासी भागांत छुप्या पद्धतीने कुंटणखानेही पथकाने उद्‌ध्वस्त
Published on

Thane Human Trafficking : शहरात रेल्वे स्थानक परिसर, ठाणे पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारे रेल्वेपूल, तलावपाळी परिसरात वारांगनांचा वावर वाढला होता. याविरोधात ठाणे अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई करून २०२३ मध्ये जानेवारी ते मे या कालावधीत २३ गुन्हे दाखल करून २५ दलालांना अटक केली असून ४० पीडितांची सुटका केली.

या कारवाईमुळे पोलिसांनी मानवी तस्करीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.रेल्वेस्थानक किंवा तलावपाळी परिसरात वारांगना अश्लील हावभाव करत असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य महिलांना बसत होता.

याबाबत तक्रारी वाढल्याने ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी तस्करीविरोधी पथकाने धडक कारवाई करून वारांगना आणि दलालांवर सातत्याने छापेमारी करून हा परिसर वारांगनामुक्त केला आहे. यासोबतच ठाण्यात निवासी भागांत छुप्या पद्धतीने कुंटणखानेही पथकाने उद्‌ध्वस्त केले.

Human Trafficking
Human Trafficking : मुलांना पळवून विक्री करणारी आंतरराज्य टोळी गजाआड

ठाण्यात वेश्या व्यवसायाविरोधात तीन वर्षांत केलेल्या धडक कारवाईत ७१ गुन्हे दाखल करून ११४ आरोपींना अटक व १७९ पीडितांची सुटका करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध विभागाने २०२० मध्ये पिटा कायद्यान्वये १३ गुन्हे दाखल करून १५ दलालांना अटक केली, तर ३४ पीडितांची सुटका केली. २०२१ मध्ये २९ गुन्हे दाखल करून ५६ दलालांना अटक, तर ७१ पीडितांची सुटका केली. २०२२ मध्ये २९ गुन्हे दाखल करून ४३ दलालांच्या मुसक्या आवळल्या, तर ६६ पीडितांची सुटका केली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Human Trafficking
Human Psychology : तुम्हालाही झोपेत खाली पडल्याचे भास होऊन जाग येते का? जाणून घ्या कारण

हायटेक, हायप्रोफाइल रॅकेट
ठाण्यात हायप्रोफाइल कुंटणखाने सुरू आहेत. ऑनलाईनच्या जमान्यात दलालही हायटेक झाले असून, फोन कॉल किंवा व्हाटॲप कॉलवर संपर्क करून वेश्याव्यवसाय केला जात आहे. त्यामुळे खबऱ्याचे नेटवर्क आणि बोगस ग्राहकाच्या माध्यमातून यावर कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे कारवाईला वेळ आणि मनुष्यबळ खर्च होत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

Human Trafficking
Police Transfer: जिल्ह्यातील 11 पोलिस ठाण्यात खांदेपालट! अधीक्षकांच्या आदेशान्वये 16 निरीक्षकांच्या बदल्या

पोलिस पथकांच्या धडक कारवाईमुळे वारांगना रस्त्यांवर दिसत नाहीत; मात्र दलालामार्फत हायटेक हायप्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू आहेत. अशा दलालांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस पथकाला अत्याधुनिक तंत्राचा वापर करावा लागत आहे. तसेच बोगस ग्राहकांच्या माध्यमातून कारवाई करावी लागत आहे.
- महेश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्ष

पोलिसांची कारवाई
वर्ष- गुन्हे - दलालांना अटक - पीडित
२०२० -१३ -१५ -३४
२०२१ -२९ -५६ -७१
२०२२ -२९ - ४३ - ६६

तीन वर्षांत केलेल्या धडक कारवाईत ७१ गुन्हे दाखल करून ११४ आरोपींना अटक व १७९ पीडितांची सुटका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.