corona
corona esakal

Mumbai : कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पालिका रुग्णालयांना सुचना

सध्या ईडी महापालिका प्रशासनाच्या ४ हजार कोटी रुपयांच्या कोविड पुरवठा घोटाळ्याची चौकशी करत आहे.
Published on

Mumbai - कोविड घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मार्च २०२० ते जून २०२३ या कालावधीत कोविडवर खर्च केलेली माहिती महापालिका प्रशासनाकडून मागवली आहे.

ईडीच्या या मागणीवरून महापालिकेच्या उपनगरीय, प्रमुख आणि विशेष रुग्णालयांतील ३५० डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांकडून या खर्चाचा संपूर्ण तपशील गोळा करून त्यांच्या वरिष्ठांकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा आदेश जारी केल्याचे सांगितले जात आहे.

corona
Mumbai : कोंडेश्वर धबधब्याकडे वळू लागली पर्यटकांची पाऊले

सध्या ईडी महापालिका प्रशासनाच्या ४ हजार कोटी रुपयांच्या कोविड पुरवठा घोटाळ्याची चौकशी करत आहे. ईडीने मागितलेली माहिती संकलित करण्यासाठी १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि ४ वैद्यकीय महाविद्यालयांमधील ३५० डॉक्टर आणि वैद्यकीय सहाय्य पथकाला कोविड पुरवठा खरेदी ऑर्डरचे तपशील देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

corona
Mumbai News : मुंबईत आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेचे; संरक्षण मोदींच्या छायाचित्राला!

महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभाग (सीपीडी) आणि अतिरिक्त आयुक्त पी. ​​वेलरासू यांनी कोविडदरम्यान ज्या सामग्रीसाठी निविदा जारी केल्या आणि मंजूर केल्या आहेत, त्या सामग्रीचा तपशील ईडीने देण्यास सांगितले आहे.दरम्यान, रुग्णालय आणि कोविड सेंटरमधून वैयक्तिकरीत्या दिलेल्या खरेदीची ऑर्डर गहाळ झाल्याचे आढळले आहे.

नायर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सीपीडीने अर्ध्याहून कमी खरेदी ऑर्डर दिल्या होत्या. रुग्णालयांना आता वापरल्या जाणाऱ्या पुरवठ्याची पडताळणी आणि प्रमाणपत्र देण्यास सांगितले जात आहे.

corona
Mumbai News : मोबाईलवर गेम खेळताना 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

वापरलेल्या पुरवठ्यांमध्ये गहाळ खरेदी ऑर्डर जोडण्यास डॉक्टरांना सांगितले जात आहे. दरम्यान, याविषयी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले, की सर्व विभागांकडून कोविड खर्चासंबंधित सर्व माहिती ईडीने मागितली आहे. यासंबंधित पत्र ईडीने फक्त महापालिका आयुक्तांना लिहिले आहे. कोणत्याही प्रकारचे अल्टिमेटम दिले गेले नाही.

corona
Mumbai News : मोबाईलवर गेम खेळताना 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

माहिती ईमेलवर अपलोड करण्याच्या सूचना
गोळा केलेली सर्व माहिती महापालिकेच्या आयटी विभागाने तयार केलेल्या समर्पित ईमेलवर २४ तासांत सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. कोविड महामारीदरम्यान मटेरियल मॅनेजमेंट मॉड्यूल आणि प्रोजेक्ट मॉड्यूलअंतर्गत खर्च केलेल्या बजेटची माहिती या ईमेलवर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.